महायुतीचे वातावरण बिघडविणाऱ्यांचा भाजपच्या वरिष्ठांनी बंदोबस्त करावा - गोपाळ लांडगे

By मुरलीधर भवार | Published: April 6, 2024 06:43 PM2024-04-06T18:43:28+5:302024-04-06T18:44:07+5:30

कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपाचे पदाधिकारी, मंत्री, खासदार त शिंदे यांच्या प्रचारासाठी हिरारीने भाग घेत आहेत . ज्या आमदाराने गोळीबार केला त्या आमदारांचे समर्थक भाजप असल्याचे भासवण्याच्या कितीही प्रयत्न केला तरी ते भाजपचे नाहीत.

BJP seniors should deal with those who spoil the atmosphere of grand alliance says Gopal Landge | महायुतीचे वातावरण बिघडविणाऱ्यांचा भाजपच्या वरिष्ठांनी बंदोबस्त करावा - गोपाळ लांडगे

महायुतीचे वातावरण बिघडविणाऱ्यांचा भाजपच्या वरिष्ठांनी बंदोबस्त करावा - गोपाळ लांडगे

कल्याण-कल्याण लोकसभेची जागा भाजपला द्यावी. अन्यथा खासदार श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करणार नाही असा ठराव भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे समर्थक असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्याला शिंदेसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी चोख उत्तर दिले आहे. महायुतीचे वातावरण बिगडविणाऱ्यांचा भाजपच्या वरिष्ठांनी बंदोबस्त करावा,असे लांडगे यांनी सांगितले.

कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपाचे पदाधिकारी, मंत्री, खासदार त शिंदे यांच्या प्रचारासाठी हिरारीने भाग घेत आहेत . ज्या आमदाराने गोळीबार केला त्या आमदारांचे समर्थक भाजप असल्याचे भासवण्याच्या कितीही प्रयत्न केला तरी ते भाजपचे नाहीत. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय यांना एकत्र घेऊन श्रीकांत शिंदे काम करतात. त्यामुळे ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील .आमदार गायकवाड यांनी जे कृत्य केले ते निश्चितच चुकीचे आहे. जर त्यांचे समर्थक असा काही कांगावा करुन युतीमध्ये घोळ घालण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे गणपत गायकवाड यांना जामीन होईल अशा भ्रमात त्यांनी राहू नये. त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत अपप्रचार करू नये. त्यामुळे युतीचे वातावरण बिघडू शकते. त्यांनी युतीचे वातावरण बिघडू नये. यात भाजपच्या वरिष्ठांनी निश्चितपणे लक्ष घालावे. त्या दृष्टीने असे जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक युतीचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख लांडगे यांनी केली आहे .

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे श्रीकांत शिंदे यांनी तिसऱ्यांदा निवडणुकीचा प्रचार सुरू केला. कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपाचे पदाधिकारी, मंत्री, खासदार त शिंदे यांच्या प्रचारासाठी हिरारीने भाग घेत आहेत. खासदार शिंदे यांचे काम जन मानसात पोहचलेले आहे. निश्चितच ते मोठ्या फरकाने निवडून येणार असल्याचा दावा लांडगे यांनी केला आहे.
 

Web Title: BJP seniors should deal with those who spoil the atmosphere of grand alliance says Gopal Landge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.