युतीचे ठरले, महाविकास आघाडीचे मात्र ठरेना...

By Ajay.patil | Published: March 13, 2024 11:38 AM2024-03-13T11:38:48+5:302024-03-13T11:40:00+5:30

रावेरची जागा भाजपाकडे, मविआमध्ये काँग्रेस की राष्ट्रवादीचा तिढा

lok sabha election 2024 decision by the maha alliance but it was not decided by the maha vikas aghadi in jalgaon | युतीचे ठरले, महाविकास आघाडीचे मात्र ठरेना...

युतीचे ठरले, महाविकास आघाडीचे मात्र ठरेना...

अजय पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : जळगाव व रावेर या दोन्ही जागा महायुतीत भाजपकडेच या जागा राहण्याचे निश्चित आहे; मात्र, महाविकास आघाडीमध्ये जळगावच्या जागेचा निर्णय झाला असला, तरी रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा कोणाकडे याबाबतचा अधिकृत निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबतच काँग्रेसनेदेखील या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघाच्या जागेचा महाविकास आघाडीतील पेच कायम आहे.

भाजपकडून इच्छुक 

- रक्षा खडसे

काय आहे जमेच्या बाजू

• सलग दोनवेळा मोठ्या मताधिक्याने विजयौ झाल्या आहेत.
• रावेर लोकसभा मतदारसंघात चांगला संपर्क
• लेवा समाजासह, गुर्जर समाजाच्या मतदारांवर चांगली पकड

काय आहेत कच्चे दुवे

• सासरे एकनाथ खडसे हे भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये गेल्यामुळे उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह
भाजपातील काही नेत्यांची नाराजी.

- डॉ. केतकी पाटील

काय आहे जमेच्या बाजू

• माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या रुग्णालयाच्या माध्यमातून मतदारसंघात चांगली ओळख
• उच्चशिक्षित व युवा चेहरा

काय आहेत कच्चे दुवे

• काही महिन्यांपूर्वीच भाजपामध्ये प्रवेश, त्यामुळे काहीसा विरोध
होण्याची शक्यता
• भाजप संघटनेत कामाचा अभाव

- अमोल जावळे

काय आहे जमेच्या बाजू

• नवीन चेहरा, हरिभाऊ जावळे यांच्या माध्यमातून राजकीय पार्श्वभूमी
• शेतीविषयक समस्यांची चांगली जाण
• जिल्हाध्यक्षपदाच्या माध्यमातून चांगले संघटन

काय आहेत कच्चे दुवे

• रावेर, यावल वगळता इतर तालुक्यांमध्ये फारसा संपर्क नाही
• हरिभाऊ जावळे यांच्याप्रमाणे मतदारांशी नाळ जोडलेली नाही.
• राजकारणाचा केवळ दोन-तीन वर्षाचा अनुभव

मविआतील इच्छुक 

- एकनाथ खडसे

काय आहे जमेच्या बाजू

• 'मास लीडर म्हणून अख्ख्या मतदारसंघासह राज्यात ओळख
• लेवा समाजासह इतर मतदारांवरही चांगला दबदबा
• मतदारांच्या समस्यांची जाण, जबरदस्त वक्तृत्व व राजकारणाचा दीर्घ अनुभव

काय आहेत कच्चे दुवे

• भाजपाच्या तुलनेने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मतदारसंघात कमी असलेले संघटन
प्रकृती अस्वास्थ्यामुळे पूर्ण मतदारसंघात फिरणे कठीण
• विविध वादांमुळे आले आहेत अडचणीत

- शिरीष चौधरी

काय आहे जमेच्या बाजू

• रावेर विधानसभेत दोनवेळा राहिले आहेत आमदार
• लेवा समाजावर चांगली पकड
• सुसंस्कृत चेहरा, वादापासून दूर

काय आहेत कच्चे दुवे.

• रावेर विधानसभा क्षेत्र वगळता इतर तालुक्यांमध्ये कमी संपर्क
• काँग्रेस पक्ष म्हणून रावेर लोकसभा मतदारसंघात मजबूत संघटनेचा अभाव

- अॅड. रवींद्र पाटील 

काय आहे जमेच्या बाजू

• सहकारच्या राजकारणाचा तगडा अनुभव भाजपकडून लेवा 
• समाजाचा उमेदवार राहिल्यास, मविआचा मराठा चेहरा 
• स्वच्छ प्रतिमा

काय आहेत कच्चे दुवे

• प्रभावी वक्तृत्वाचा अभाव व मतदारसंघात फारसा संपर्क नाही 
•कार्यकर्त्यांचे जाळे नाही
• सहकारमध्ये तगडा अनुभव असला, तरी मोठ्या निवडणुकांमध्ये अनेकवेळा झाला पराभव


 

Web Title: lok sabha election 2024 decision by the maha alliance but it was not decided by the maha vikas aghadi in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.