जालना लोकसभा निवडणूक निकाल 2019:  भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे मोठ्या आघाडीच्या दिशेने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 04:54 PM2019-05-23T16:54:46+5:302019-05-23T16:55:10+5:30

Jalna Lok Sabha Election Results 2019 : मतमोजणीत दानवे यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली आहे. 

Jalna Lok Sabha Election 2019 live result & winner: Raosaheb Dadarao Danve VS  Vilas Keshavrao Autade Votes & Results  | जालना लोकसभा निवडणूक निकाल 2019:  भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे मोठ्या आघाडीच्या दिशेने 

जालना लोकसभा निवडणूक निकाल 2019:  भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे मोठ्या आघाडीच्या दिशेने 

Next

जालना : भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या जालना लोकसभा मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, काँग्रेसचे विलास औताडे आणि वंचित बहुजन आघाडीचे शरदचंद्र वानखेडे यांच्यात मुख्य लढत होत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे सलग पाचव्यांदा या मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसाठी ही निवडणूक अस्तित्वाचा प्रश्न बनली आहे. 

गेल्या सहा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विजयश्री खेचून आणता आली नाही. दानवे हे २००९ चा अपवाद वगळता नेहमीच कुठल्याना कुठल्या लाटेवर निवडणुन आले आहेत. यंदा अशी कुठलीच लाट नसल्याने आणि शेतकरी विरोधी विधानाने दानवेंना त्यांचा गड राखण्यात यश मिळते की, स्वच्छ प्रतिमेचे औताडे मुसंडी मारतात, याबद्दल उत्सुकता आहे.  
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत दानवे यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली आहे. 

मतदारसंघः जालना

फेरीः पंधरावी

आघाडीवरील उमेदवाराचे नावः रावसाहेब दानवे
पक्षःभाजप
मतंः 432621

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः विलास ओताडे
पक्षः कॉंग्रेस
मतंः222898

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः शरदचंद्र वानखेडे
पक्षः वंचित
मतंः38392

जालना लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ६५ हजार ०४६ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ६४.५५ टक्के मतदान झालंय.

गेल्या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी  लाख ९१ हजार ४२८ मतांसह विजय साकारला होता, तर काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे  यांना ३ लाख ८४ हजार ६३० मतं मिळाली होती.

Web Title: Jalna Lok Sabha Election 2019 live result & winner: Raosaheb Dadarao Danve VS  Vilas Keshavrao Autade Votes & Results 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.