मतदार हेल्पलाईनवर १६३० कॉल्स्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 12:41 AM2019-04-05T00:41:17+5:302019-04-05T00:41:39+5:30

मतदार हेल्पलाईनवर ४५ दिवसात १६३० कॉल्स्ची नोंद झाली असून कॉल करणाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली आहेत.

1630 colleges on the voter's helpline | मतदार हेल्पलाईनवर १६३० कॉल्स्

मतदार हेल्पलाईनवर १६३० कॉल्स्

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लोकसभा निवडणूक चोखपणे पार पडावी तसेच मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. मतदारांच्या मनातील शंका- कुशंका यांचे निरसन व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार हेल्पलाईनची सुविधा तयार करण्यात आली आहे. या मतदार हेल्पलाईनवर ४५ दिवसात १६३० कॉल्स्ची नोंद झाली असून कॉल करणाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली आहेत.
अनेकदा मतदार निवडणूक केंद्रावर गेल्यावर मतदान यादीत नाव नसणे, चुकीचे नाव असणे, पत्यात बदल असणे या सारख्या असंख्य प्रश्नांना सामोरे जावे लागते. मतदारांच्या समस्या सोडता याव्यात, यासाठी ०२८२१९५० या हेल्पलाईनची सुविधा १७ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आली आहे. १ फेब्रुवारीपर्यंत या हेल्पलाईन क्रमांकावर ७४ कॉलची नोंद झाली होती. १ फेबु्रवारी ते १ एप्रिलपर्यंत १५२७ तर मंगळवारी एक दिवसात जवळपास ३० कॉल या हेल्पलाईनवर आले आहेत. असे १७ जानेवारी ते २ एप्रिल या ४५ दिवसांच्या कालावधीत १६३० कॉलची नोंद झालेली आहेत.
या हेल्पलाईन कक्षाची स्थापना जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या मार्गदशनाखाली करण्यात आली. जालना जिल्ह्यात लोकसभेची निवडणूक २३ एप्रिल रोजी होत आहे.
मतदार याद्या बिनचूक तयार व्हाव्यात, यासाठी या हेल्पलाईनची सुविधा तयार करण्यात आली आहे. यात नवमतदार आमचे यादीत नाव आहे का याची व ओळखपत्रासंबंधी विचारपूस करत आहेत.
यावेळी त्यांना त्यांच्या अडचणींबाबत मार्गदर्शन केले जात आहे. तसेच नावात बदल करण्यासाठी काय करावे, पत्त्यात बदल, चुकलेला फोटो असल्यास तो बदलणे, मतदान केंद्र आदींबाबत या क्रमांकावर मतदार प्रश्न विचारत आहेत. त्यांना प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली जातात. दरम्यान, मतदारांसाठी सुरु करण्यात आलेल्या नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून, अनेकांना येणाऱ्या अडचणी यामुळे सुटण्यास मदत होत आहे. त्यातच अनेकांनी आपले नाव मतदार यादीत आले नसल्याच्या तक्रारी या हेल्पलाईनवर मोठ्या आल्या असल्याची माहिती निवडून विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिली आहे. काही तक्रारी असल्यास तक्रारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वातावरण तापतेय
लोकसभेची निवडणूक २० दिवसांवर आली आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. यात मतदारराजाही सज्ज आहे. मतदानाला गेल्यानंतर ऐनवेळी विविध अडचणी येतात. मतदारांची असुविधा होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने सदर हेल्पलाईन सुरु केली आहे. या हेल्पलाईनवर आतापर्यंत १६३० मतदारांनी आपल्या विविध अडचणीसंदर्भात नोंदणी केल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: 1630 colleges on the voter's helpline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.