मुलीला स्तनपान करत मॉडेल मारा मार्टिनने केला रॅम्पवॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 06:20 PM2018-07-17T18:20:32+5:302018-07-17T18:21:47+5:30

मॉडेल मारा मार्टिन स्पोर्टस इलस्ट्रेटेड स्विमसूट फॅशन शोच्या रॅम्पवर उतरली आणि तिच्या या रॅम्पवॉकची जगभर चर्चा झाली. होय, मॉडेल मारा मार्टिनने आपल्या मुलीला स्तनपान करत करत रॅम्पवॉक केला.

Model Mara Martin breastfeeds her baby as she walks the ramp | मुलीला स्तनपान करत मॉडेल मारा मार्टिनने केला रॅम्पवॉक

मुलीला स्तनपान करत मॉडेल मारा मार्टिनने केला रॅम्पवॉक

googlenewsNext

मॉडेल मारा मार्टिन स्पोर्टस इलस्ट्रेटेड स्विमसूट फॅशन शोच्या रॅम्पवर उतरली आणि तिच्या या रॅम्पवॉकची जगभर चर्चा झाली. होय, मॉडेल मारा मार्टिनने आपल्या मुलीला स्तनपान करत करत रॅम्पवॉक केला. माराची मुलगी आरिया ही पाच महिन्यांची आहे. चिमुकल्या आरियाला माराने छातीशी कवटाळले आहे. आरिया शांतपणे स्तनपान करतेय आणि त्याच अवस्थेत रॅम्पवॉक करतेय, हे दृश्य पाहून सगळेचं स्तब झालेत. सगळ्यांच्या नजरा या मारावर खिळल्या. कारण मॉडेलिंगच्या दुनियेत प्रथमच कुण्या मॉडेलने आपल्या बाळाला स्तनपान करता करता रॅम्पवॉक केला असेल. आजपर्यंत चित्रविचित्र, बहुरंगी पोशाष घालून, अतरंगी स्टाईल करून मॉडेल रॅम्पवर उतरल्यात. पण प्रथमच मारा मार्टिन आपल्या मुलीला ब्रेस्टफिड करतांना रॅम्पवर दिसली.


सध्या माराचा हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडिओत मारा अतिशय आनंदी दिसतेय. तिने स्वीमसूट घातलाय. या व्हिडिओतील एक ठळकपणे नोंदवावी अशी बाब म्हणजे, आपल्या चिमुकलीला स्तनपान करत करत रॅम्पवर उतरलेल्या माराला लोक उत्साहाने चीअरअप करताहेत. तिच्यासाठी टाळ्या वाजवत आहेत.
मारा मार्टिन ही मिशिगनची राहणारी आहे. स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड मॅगझिनने मियामी स्वीम वीकसाठी निवडलेल्या १६ फायनलिस्टपैकी मारा एक आहे.

 

Web Title: Model Mara Martin breastfeeds her baby as she walks the ramp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.