इंटरनेटवर 'या' सौंदर्यवतींना सर्च करणं पडू शकतं महागात, बघा सेलिब्रिटींची यादी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 01:31 PM2018-10-05T13:31:26+5:302018-10-05T13:50:54+5:30

जर तुम्हीही असं करत असाल तर आता तुम्हाला जरा सावध राहण्याची गरज आहे. कारण अशाप्रकारे काही सेलिब्रिटींना इंटरनेटवर सर्च करणे तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं. 

8 most dangerous celebrity searches | इंटरनेटवर 'या' सौंदर्यवतींना सर्च करणं पडू शकतं महागात, बघा सेलिब्रिटींची यादी!

इंटरनेटवर 'या' सौंदर्यवतींना सर्च करणं पडू शकतं महागात, बघा सेलिब्रिटींची यादी!

googlenewsNext

आपल्या आवडत्या सेलिब्रिटींना इंटरनेटवर सर्च करणे हे अनेक चाहत्यांचं आवडीचं काम असतं. सोशल मीडियात अनेक सेलिब्रिटींचे फोटो, व्हिडीओ असतात आणि त्यांचे फॅन त्यांची माहिती घेण्यासाठी इंटरनेट सर्च करतात. जर तुम्हीही असं करत असाल तर आता तुम्हाला जरा सावध राहण्याची गरज आहे. कारण अशाप्रकारे काही सेलिब्रिटींना इंटरनेटवर सर्च करणे तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं. 

कारण सायबर सिक्युरिटी कंपनी मॅकेफीने एका सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार यातील सेलिब्रिटींची नावे सर्च केल्यास धोकादायक ठरु शकतं. आता तुम्ही म्हणाल की, एखाद्या सेलिब्रिटीचं नाव सर्च केल्याने काय धोका? तर याचं कारण हे आहे की, या सेलिब्रिटींच्या नावांच्या सर्चमध्ये अनेक धोकादाय लिंक असतात आणि या लिंक तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकतात. 

किम कार्दिशियन (Kim Kardashian)

अमेरिकन टीव्ही स्टार किम २०१८ मध्ये इंटरनेटवर सर्च केली जाणारी सर्वात धोकादायक सेलिब्रिटी ठरली आहे.  किम आपल्या हॉट अदांसाठी जगभरात लोकप्रिय आहे. त्यामुळे तिचे फोटोज आणि तिच्यासंबंधी बातम्या वाचण्यासाठी मोठ्या प्रमाणात सर्च केल्या जातं. 

कोर्टनी कार्दिशियन (Kourtney Kardashian)

किमप्रमाणेच तिची बहीण कोर्टनी कार्दिशियनचं नाव सुद्धा या यादीत आलं आहे. त्यामुळे तिच्या नावाने इंटरनेटवर काहीही सर्च करताना काळजी घ्यावी. 

अॅडेल

ब्रिटनची प्रसिद्ध गायिका अॅडेलचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. अॅडेलची जगभरात लोकप्रियता आहे त्यामुळे तिच्याबाबतही तिचे चाहते इंटरनेटवर मोठ्या प्रमाणाच सर्च करतात. 

कॅरोलीन फ्लेक (Caroline Fleck)

ब्रिटनची टीव्ही-रेडिओ प्रेझेंटर आणि मॉडल कॅरोलिन ही सुद्धा या धोकादायक सौंदर्यवतींपैकी एक आहे. 

नाओमी कॅपबेल (Naomi Campbell)

आपल्या सौंदर्यासाठी जगभरात प्रसिद्ध असलेली सुपरमॉडल नाओमी जितकी लोकप्रिय आहे, पण तिला सर्च करणं तितकीच धोकादायक आहे.  

रोज ब्रायन (Rose Bryan)

अभिनेत्री रोज ब्रायनचं नाव सर्च करणंही तुम्हाला महागात पडू शकतं. 

ब्रिटनी स्पीयर्स (Britni Spirs)

प्रसिद्ध गायिका ब्रिटनी स्पीयर्सचं सुद्धा नाव सर्च करताना तुम्हाला फार काळजी घेणे गरजेचे आहे. 

एमा रॉबर्ट्स (Emma Roberts)

अभिनेत्री एमा रॉबर्ट्सचं सुद्धा या यादीत नाव देण्यात आलं असून तिला सर्च करणंही धोकादायक ठरु शकतं. 

दरम्यान, मॅकेफीचं म्हणनं आहे की, 'सायबर विश्वात गुन्हेगार हे नेहमीच लोकप्रिय व्यक्तींच्या नावांचा वापर करतात. जेणेकरुन तुम्ही त्या लिंकवर क्लिक कराल आणि एखाद्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक वेबसाईटवर पोहोचाल. या वेबसाईट्वर व्हायरस असतात. ज्या माध्यमातून यूजर्सची माहिती आणि पासवर्ड हॅक केले जातात. त्यामुळे या हॉलिवूडच्या सौंदर्यवती तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकतात. अशात त्यांना सर्च करण्यापूर्वी चारदा विचार करा. या समस्येपासून बचाव करण्यासाठी यूजर्सनी विश्वासार्ह वेबसाईटची निवड केली पाहिजे. कोणत्याही माहीत नसलेल्या वेबसाईटवर क्लिक करु नये. 

Web Title: 8 most dangerous celebrity searches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.