Lok Sabha Election 2019; बाहेरच्या १० हजार जवानांनी दिली सुरक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:17 AM2019-04-14T00:17:45+5:302019-04-14T00:18:10+5:30

मतदान शांततेत पार पडावे, यासाठी राज्यभरातून सुमारे १० हजार पोलीस कर्मचारी व ४०० अधिकारी बोलविण्यात आले होते. जिल्ह्यात १० हजार पोलीस, सीआरपीएफ, एसआरपीएफ जवान तैनात आहेत. बाहेरचे व जिल्ह्यातील असे एकूण जवळपास २० हजार पोलीस जवानांनी निवडणुकीदरम्यान सुरक्षा व्यवस्था सांभाळली.

Lok Sabha Election 2019; Outside 10 thousand soldiers gave security | Lok Sabha Election 2019; बाहेरच्या १० हजार जवानांनी दिली सुरक्षा

Lok Sabha Election 2019; बाहेरच्या १० हजार जवानांनी दिली सुरक्षा

Next
ठळक मुद्देमतदानाच्या दिवशी नेमणूक : ४०० पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मतदान शांततेत पार पडावे, यासाठी राज्यभरातून सुमारे १० हजार पोलीस कर्मचारी व ४०० अधिकारी बोलविण्यात आले होते. जिल्ह्यात १० हजार पोलीस, सीआरपीएफ, एसआरपीएफ जवान तैनात आहेत. बाहेरचे व जिल्ह्यातील असे एकूण जवळपास २० हजार पोलीस जवानांनी निवडणुकीदरम्यान सुरक्षा व्यवस्था सांभाळली. त्यामुळे अपवादात्मक घटना वगळता मतदान शांततेत पार पडले.
गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास निम्मे मतदान केंद्र नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहे. या मतदान केंद्रांवर मतदान घेणे प्रशासनासाठी मोठे आव्हान आहे. हे आव्हान प्रत्येक निवडणुकीच्या वेळी स्विकारून निवडणुका शांततेत पार पाडल्या जातात.
नक्षल्यांच्या बिमोड करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात सुमारे १० हजार पोलीस, एसआरपीएफ, सीआरपीएफचे जवान व अधिकारी तैनात आहेत. मात्र निवडणुकीच्या कालावधीत प्रत्येक मतदान कर्मचाऱ्यांच्या पथकाला सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी लागते. त्यांना जंगलातून मतदान केंद्रापर्यंत नेणे व सुखरूप परत आणणे ही जबाबदारी पोलीस जवानांना स्विकारावी लागते. दुर्गम भागातील एका पथकाच्या मागे किमान २५ ते ३० तर वेळप्रसंगी ५० जवान उपलब्ध करून दिले जातात. लोकसभेच्या वेळी जिल्हाभरात एकाच वेळी मतदान होत असल्याने जिल्ह्यात जरी १० हजार पोलीस असले तरी हा पोलीस दल कमी पडतो. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यातून सुमारे १० हजार पोलीस कर्मचारी व सुमारे ४०० अधिकारी बोलविण्यात आले होते. १० हजार कर्मचाºयांमध्ये प्रशिक्षण घेणाºया महिला पोलीस, होमगार्ड यांचाही समावेश होता. मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी या जवानांना गडचिरोली जिल्ह्यात डेरेदाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना मतदानाच्या अगोदरच्या दिवशी मतदान केंद्रावर पोहोचविण्यात आले. या कर्मचाºयांच्या सहकार्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील यावर्षीची लोकसभेची निवडणूक अपवाद वगळता अतिशय शांततेत पार पडली.

गडचिरोलीकरांनीही आपलेसे करून घेतले
गडचिरोली शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर बाहेरच्याच पोलीस कर्मचारी व अधिकाºयांची नेमणूक केली होती. त्यांची बोलीभाषा व चेहºयावरून ओळख पटत होती. सगळीकडे बाहेरचेच पोलीस कर्मचारी दिसत असल्याने निवडणुकीसाठी त्यांची नेमणूक झाली असल्याचा अंदाज गडचिरोलीकरांना आला. काही मतदारांनी जवानांचे नाव, गाव विचारून तेथील राजकीय परिस्थिती विचारली. यातून भावनिक नाते निर्माण होण्यास मदत झाली. हे सर्व कर्मचारी तीन ते चार दिवस गडचिरोली येथे थांबले होते. निवडणुकीच्या दुसºया दिवशी या सर्वांना निरोप देण्यात आला. या सर्व कर्मचाºयांना स्वतंत्र बसने गडचिरोली येथे आणण्यात आले होते.
शहरी भागातील मतदान केंद्रांवर नेमणूक
नक्षलग्रस्त भागातून प्रवास करताना पोलीस कर्मचाºयांना युध्द कौशल्य वापरावे लागते. बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या पोलीस जवानांना हे कौशल्य प्राप्त नाही. तसेच त्यांना येथील भौगोलिक, सांस्कृतिक व नक्षलवादाविषयी माहिती नाही. त्यामुळे त्यांची दुर्गम भागात नियुक्ती करणे धोक्याचे ठरले असते. ही बाब लक्षात घेऊन नवख्यांना गडचिरोली, देसाईगंजा, चामोर्शी, आरमोरी यासारख्या तालुकास्तरावर नेमणूक देण्यात आली. त्यांच्या बोलीभाषेवरून ते कोकण, मराठवाडा येथील असल्याचे दिसून येते.

Web Title: Lok Sabha Election 2019; Outside 10 thousand soldiers gave security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.