बिग बॉस मराठी 2 : घरात जाणार पहिल्या सीझनचे 'हे' सदस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 12:32 PM2019-07-03T12:32:40+5:302019-07-03T12:43:19+5:30

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज खास अतिथी येणार आहेत. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आणि भरभरून प्रेम मिळाले

These members of the first season going to the Bigg Boss house | बिग बॉस मराठी 2 : घरात जाणार पहिल्या सीझनचे 'हे' सदस्य

बिग बॉस मराठी 2 : घरात जाणार पहिल्या सीझनचे 'हे' सदस्य

googlenewsNext
ठळक मुद्देपहिल्या पर्वाचे सदस्य घरामध्ये येणार आहेत

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज खास अतिथी येणार आहेत. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आणि भरभरून प्रेम मिळाले. त्यातील सदस्य, त्यांची मैत्री, त्यांनी केलेले टास्क अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत आणि आता त्याच पर्वातील काही सदस्य बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येणार आहेत. आज घरामध्ये येणार पहिल्या सिझनमधील सई, पुष्कर, स्मिता आणि शर्मिष्ठा पुन्हा त्याच आठवणी, गप्पा, भांडण, टास्क त्यांना आठवणार हे नक्की. घर तेच आहे, फक्त सदस्य वेगळे आहेत... ते दिवस पुन्हाएकदा त्यांच्या नजरेसमोरून जाणार. ते टास्क मध्ये असणार खर पण, टास्क ते समोरून बघणार आहेत, घरातील सदस्यांना टास्क देणार आहेत. तेव्हा बघूया पहिले पर्व गाजवलेले हे सदस्य किती मज्जा मस्ती करणार, काय टास्क देणार, आणि कोणता सदस्य त्यांचे मनं जिंकणार.

आज घरामध्ये बिग बॉस सदस्यांना नवा टास्क देणार आहेत आणि ज्यासाठीच पहिल्या पर्वाचे सदस्य घरामध्ये येणार आहेत... काल सगळे सदस्य बंद हॉटेलमध्ये अडकले होते आणि वेगवेगळी कार्य यशस्वीरीत्या पार पाडून सदस्यांनी या हॉटेलचा संपूर्ण ताबा मिळवला.

 आज हेच बंद पडलेले “BB हॉटेल” घरातील सदस्य पुन्हा नव्याने सुरु करणार आहेत. या हॉटेलचे नाव सदस्यांनी “आईचा विसावा” असे ठेवले आहे. आता सदस्यांना घरामध्ये येऊन एक महिना उलटला आहे, आणि त्यामुळेच बाहेरच्या जगाशी, बाहेरच्या माणसांशी, घटनांशी त्यांचा काहीच संबंध नाहीये. या टास्कमुळे घरातील सदस्यांना खास पाहुण्यांना भेटण्याची संधी बिग बॉसनी आज सदस्यांना दिली... या सदस्यांचे घरातील सदस्यांनी जंगी स्वागत केले... आता बघूया पुढे घडते. 

Web Title: These members of the first season going to the Bigg Boss house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.