मौनी रॉयच्या 'त्या' फोटोची म्हणून होतेय इतकी चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 10:31 AM2017-11-06T10:31:41+5:302017-11-06T16:09:02+5:30

तिचा बोल्ड लूक आणि बिनधास्त अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच असतो. ऑनस्क्रीन असो किंवा मग ऑफस्क्रीन तिच्या प्रत्येक ...

So much talk about Muni Roy's 'That' photo! | मौनी रॉयच्या 'त्या' फोटोची म्हणून होतेय इतकी चर्चा!

मौनी रॉयच्या 'त्या' फोटोची म्हणून होतेय इतकी चर्चा!

googlenewsNext

/>तिचा बोल्ड लूक आणि बिनधास्त अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच असतो. ऑनस्क्रीन असो किंवा मग ऑफस्क्रीन तिच्या प्रत्येक अंदाजाने लक्ष नाही वेधले तरच नवल.छोट्या पडद्यावरची नागिन म्हणून आजही ती ओळखली जाते. मात्र आता तिची हीच इमेज काही दिवसातच बदलच नवीन ओळख मिळवणार ती अभिनेत्री म्हणजे मौनी रॉय. अक्षयकुमारच्या गोल्ड या सिनेमात ती अक्षय कुमारच्या सिनेमात झळकणार आहे. त्यामुळे छोट्या पडद्यपासून सुरू केलेलाल तिचा प्रवास आता मोठ्या पडद्यावर येऊन पोहचला आहे.मौनी रॉय सध्या जास्त  ऑन एंड ऑफ स्क्रीन कॅमे-यात कैद झालेल्या बोल्ड लूकमुळेच जास्त चर्चेत असते. मौनी प्रत्यक्ष जीवनातही बिनधास्त आणि रोखठोक आहे.. हॉट अदा आणि आयटम नंबर करणा-या मौनीला काही तरी वेगळं करायचं होतं.त्याचप्रमाणे सिनेमातही तिच्या वाट्याला खास भूमिका आल्यामुळे आता बॉलिवूडवरच लक्षकेंद्रीत करणार असल्याचे तिने म्हटले आहे.सध्या ती वेगवेगळ्या अंदाजातले फोटोशूट करते. सोशल मीडियावर तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे रूपेरी पडद्यावर एंट्री करत बॉलिवूडआधीच सोशल मीडियावर सध्या  फॅन्समध्ये फक्त मौनी रॉयची हवा असल्याचे पाहायला मिळतंय.मात्र फोटोशूट करत सध्या ती तिच्या आगामी सिनेमाचेच प्रमोशन करत असल्याचेही बोलले जात आहे.सिनेमाच्या प्रमोशनसाठी बॉलिवूडमधेय एकाहून एक फंडे दिवसागणिक समोर येतायत... प्रत्येकाचा फंडा अजब असतो... अगदी त्याचप्रमाणे मौनी रॉयने प्रमोशनसाठी ही वाट धरली असावी अशाही चर्चा रंगत आहेत.

छोट्या पडद्यावर 'देवों के देव महादेव' मालिकेत पार्वती ही भूमिका साकारण्याची संधी लाभली त्यामुळे ती स्वतःला नशिबवानही समजते.सध्या मौनीला अनेक टीव्ही मालिका आणि पौराणिक मालिकांसाठीही ऑफर्स येत आहेत. मात्र आता तिला सिनेमा करण्यासाठी वेळ द्यायचा आहे. यासाठी तिच्याकडे येणा-या अनेक टीव्ही ऑफर्सना नकार दिला आहे. ठराविक  भागांची मालिका किंवा रिअॅलिटी शो असणार तरच करणार असल्याचे कळतंय.मौनीला मालिकांमध्ये अडकून न राहता सिनेमासाठी काम करायचे आहे.काहीही झाले तरी पौराणिक मालिकांमध्ये काम करायचे नाही असे तिने ठरवले आहे.पौराणिक मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेली मौनी रॉय आता बॉलिवूडमध्ये हिरोईन बनत आपली नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
  

Web Title: So much talk about Muni Roy's 'That' photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.