'शक्ती अस्तित्व के एहसास की' मालिकेत येणार नवीन वळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 06:30 AM2019-01-28T06:30:00+5:302019-01-28T06:30:00+5:30

सुखविंदर सिंगची भूमिका साकारणार आहे जसवंत मेनरिया तर शिवानी गोसेन त्याची बायको निली सिंगची भूमिका साकारणार आहे.  

Shivani Gosain and Jaswant Menaria to stir up the drama in COLORS’ Shakti...Astitva Ke Ehsaas Ki | 'शक्ती अस्तित्व के एहसास की' मालिकेत येणार नवीन वळण

'शक्ती अस्तित्व के एहसास की' मालिकेत येणार नवीन वळण

googlenewsNext

जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नाकारले जाण्याशी सामना करून सुध्दा सामान्य जीवन जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या एक किन्नर असलेल्या सौम्याची हृद्यस्पर्शी कहाणी प्रेक्षकांना कलर्सच्या शक्ती...अस्तित्व के एहसास की मधून आवडते आहे. सध्या सुरू असलेल्या ट्रॅकमध्ये सुरभीच्या (रोशनी सहोता) मृत्युनंतर ती आईपणाचा अनुभव घेत आहे, सुरभीच्या बाळाला ती प्रेमाने आणि काळजीपूर्वक सांभाळत आहे. 

सौम्या आणि हरमन (विवियन देसना) हरक सिंगला (सुदेश बेरी) समजावण्याचा प्रयत्न करत आहेत की मागील सर्व पूर्वग्रह सोडून देऊन या बाळाला स्वीकार. या सर्व नाट्या मध्ये प्रेक्षकांसाठी अजून एक आश्चर्य असणार आहे, प्रीतोचा (काम्या पंजाबी) भाऊ सुखविंदर सिंग परत येणार आहे. सुखविंदर सिंगची भूमिका साकारणार आहे जसवंत मेनरिया तर शिवानी गोसेन त्याची बायको निली सिंगची भूमिका साकारणार आहे.  

खूनाच्या आरोपाखाली तुरूंगात असलेला दुष्ट सुखविंदर सिंग आता सुटून आला आहे. हरक सिंगचा भाऊ वीरन (भुवन चोप्रा) सुध्दा या गुन्ह्यात सामील होता पण सुखविंदरला एकट्यालाच शिक्षा झाली होती. हरक आणि वीरनचा राग मनात धरून असणाऱ्या सुखविंदरचा मुख्य हेतू आहे हरक सिंगचे कुटुंब नष्ट करण्याचा आणि त्याला तुरूंगात घालवाव्या लागलेल्या दिवसांचा बदला घेण्याचा. 

शो मधील प्रवेशा विषयी बोलताना जसवंत म्हणाले, ''संवेदनशील पण प्रस्तुत विषय हाताळणाऱ्या शक्ती...अस्तित्व के एहसास की सारख्या शोमध्ये सहभागी होताना मला आनंद झाला आहे. माझे पात्र असलेला सुखविंदर जे पाहिजे त्यासाठी लढतो मग तो परिणामाची पर्वा करत नाही. आता त्याला त्याच्या मार्गात येणाऱ्यांचा सूड घ्यायचा आहे. 

मी याआधी नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. पण ही भूमिका थोडी तीव्र स्वरूपाची असून त्याला अनेक छटा आहेत. मला आशा आहे की प्रेक्षक माझ्या प्रयत्नांना दाद देतील.” सौम्याला बाळा पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करण्यासाठी वरूण आणि मनिंदर आधीच एकत्र आले आहेत, आता मालिकेतल्या आगामी भागात रसिकांना काय पाहायला मिळणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.
 

Web Title: Shivani Gosain and Jaswant Menaria to stir up the drama in COLORS’ Shakti...Astitva Ke Ehsaas Ki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.