‘विठुमाऊली’ मालिकेत पुंडलिकाला मारण्यासाठी कली घेणार यमाचे रुप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 05:59 PM2018-11-05T17:59:13+5:302018-11-05T18:02:00+5:30

‘विठुमाऊली’ मालिकेतून विठुरायाच्या भक्तीचा महिमा अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळत असते.

In the series 'Vithmauli', the bud will be taken to kill the pundalika | ‘विठुमाऊली’ मालिकेत पुंडलिकाला मारण्यासाठी कली घेणार यमाचे रुप

‘विठुमाऊली’ मालिकेत पुंडलिकाला मारण्यासाठी कली घेणार यमाचे रुप

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘विठुमाऊली’चा विशेष भाग

स्टार प्रवाहवरील ‘विठुमाऊली’ मालिकेतून विठुरायाच्या भक्तीचा महिमा अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळत असते. या पुढील भागांमध्येही विठोबाच्या दिव्यत्वाची प्रचिती घेता येणार आहे.

विठ्ठलाचा लाडका भक्त पुंडलिकाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पुंडलिकाला यमसदनी धाडण्याचे षडयंत्र कलीने आखले आहे. पुंडलिक विठ्ठलाचा श्रेष्ठ भक्त होऊ नये यासाठी कलीने बरेच प्रयत्न केले, पण पुंडलिकाच्या भक्तीपुढे कलीची कारस्थाने नेहमी फिकी पडली. यावेळी मात्र पुंडलिकाला धडा शिकवण्यासाठी कली यमाचे रुप धारण करणार आहे. पुंडलिकाला यमसदनी धाडण्याचा कलीचा डाव यशस्वी होणार का? विठुराया लाडक्या भक्ताचा जीव वाचवणारा का? कलीला त्याच्या कुकर्मांचं शासन मिळणार का? याची उत्तर ‘विठुमाऊली’च्या विशेष भागातून मिळणार आहेत. हा विशेष भाग १० नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.


 ‘विठुमाऊली’ या मालिकेच्या माध्यमातून प्रथमच सावळ्या विठ्ठलावर आणि त्याच्या सख्यांवर आधारित मालिका मराठी टेलिव्हिजनवर पाहायला गेल्या एक वर्षापासून मिळत आहे. संत, भक्ती यांच्या पलीकडे जाऊन विठ्ठलाचे माणूसपण, त्याच्या प्रेमाची दुर्लक्षित कथा हे या मालिकेचे वेगळेपण आहे. या आधी ही या आधी ही कोठारे व्हिजनने जय मल्हार, मन उधाण वाऱ्याचे, गणपती बाप्पा मोरया अशा अनेक प्रसिद्ध मालिका छोट्या पडद्याला दिल्या आहेत.
 

Web Title: In the series 'Vithmauli', the bud will be taken to kill the pundalika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.