राजकन्येला प्रेक्षकांची विशेष पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 04:16 PM2019-03-15T16:16:18+5:302019-03-15T16:17:49+5:30

अवनीचा मदतीला धावून जाण्याचा स्वभाव आणि  रोखठोकपणे आपली मतं मांडण्याचा स्वभाव प्रेक्षकांनी नक्की अनुभवला असेल. अशा ह्या बाबांच्या लाडक्या राजकन्येचा एक अनोखा  प्रवास रसिकांना पाहायला मिळणार आहेत.

Rajkanya new Serial Getting Good Response From Audience | राजकन्येला प्रेक्षकांची विशेष पसंती

राजकन्येला प्रेक्षकांची विशेष पसंती

googlenewsNext

गेले काही दिवस बाबांच्या ज्या राजकन्येविषयी सर्वत्र चर्चा चालली होती ती राजकन्या आता प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. साधी, मध्यमवर्गीय, मनमिळावू अशी राजकन्येच्या रुपातून ‘अवनी जयराम भोसले’ छोट्या पद्यावर आपल्याला दिसली आणि अगदी पहिल्याच एपिसोड पासूनच  तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत .सोनी मराठी वरील ‘एक होती राजकन्या’ या नवीन मालिकेचा पहिला एपिसोड नुकताच प्रदर्शित झाला आहे .   अभिनेते किशोर कदम आणि अभिनेत्री किरण ढाणे यांच्या अभिनयाने सुरुवात झालेल्या या मालिकेच्या पहिल्या एपिसोडमध्येच  एकंदरीत वडील आणि मुलीच्या गोड  नात्याची गुंफण पाहायला मिळत आहे

 नेहमी डॉक्टर बनून समाजसेवा करण्याचं स्वप्नं पाहणा-या अवनीचा कॉन्स्टेबल म्हणून प्रवासाला सुरुवात झाली आहे.आणि ती नुकतीच अनुकंपातत्वावर पोलीस  खात्यात भरती झाली आहे .  अनुकंपा तत्व म्हणजे शासकीय सेवेत असताना दिवंगत किंवा अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांच्या नातेवाईकांची त्यांच्या ठिकाणी काम करण्यासाठी नियुक्ती केली जाते. बाबांचं छत्र हरवल्यामुळे त्यांच्या जागी अनुकंपा तत्वावर आपल्या अवनीची नियुक्ती झाली आहे. बाबांचं छत्र हरवल्यानंतर खंबीर बनून अवनी सर्व जबाबदा-या योग्य रितीने पार पाडण्याच्या प्रयत्नात आहे. बाबांची शिकवण आणि त्यांच्या कर्तबगारीमुळे त्यांच्यातील गुण हे  अवनीमध्ये देखील आपसूक आले आहेत. अवनीचा मदतीला धावून जाण्याचा स्वभाव आणि  रोखठोकपणे आपली मतं मांडण्याचा स्वभाव प्रेक्षकांनी नक्की अनुभवला असेल. अशा ह्या बाबांच्या लाडक्या राजकन्येचा एक अनोखा  प्रवास रसिकांना पाहायला मिळणार आहे.

Web Title: Rajkanya new Serial Getting Good Response From Audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.