पंचमने मुरारीसमोर उघड केले त्याचे गुपित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 07:22 PM2018-10-08T19:22:41+5:302018-10-08T19:23:12+5:30

सोनी सबवरील 'जिजाजी छत पर हैं' या मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना अनपेक्षित धक्का देणाऱ्या काही गोष्टी घडणार आहेत.

Pancham revealed his secret | पंचमने मुरारीसमोर उघड केले त्याचे गुपित

पंचमने मुरारीसमोर उघड केले त्याचे गुपित

googlenewsNext


सोनी सबवरील 'जिजाजी छत पर हैं' या मालिकेने प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी नवे दिले आहे. इलायचीच्या भूमिकेतील हिबा नवाब आणि पंचमच्या भूमिकेतील निखिल खुराणा या मुख्य जोडीमुळे भरपूर मनोरंजन होते. आगामी भागातही प्रेक्षकांना अनपेक्षित धक्का देणाऱ्या काही गोष्टी घडणार आहेत.


एके दिवशी बातम्यांमध्ये दाखवले जाते की, पृथ्वीवर उल्कापात होणार आहे आणि आठवडाभरात पृथ्वी नष्ट होणार आहे. या बातमीने सगळीकडेच घबराट उडते आणि प्रत्येकजण जग नष्ट होण्याआधी आपली शेवटची इच्छा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असतो. मुरारी (अनुप उपाध्याय) आणि करुणा (सोमा राठोड) पुन्हा एकदा हनिमूनला जाण्याचे ठरवतात. तर, चंटकीने (फिरोज खान) चोरलेले हिरे तो त्या कुटुंबाला परत देऊन टाकतो. इलायची (हिबा नवाब) आणि सुनिता (राशी बावा) या परिस्थितीचा फायदा घेत पंचम (निखिल खुराणा) आणि पिंटूला (हरवीर सिंग) त्यांच्या संभाव्य सासरेबुवांपुढे आपल्या प्रेमाची कबुली देण्यास सांगतात. पंचम
आणि पिंटू असे करण्याचा निर्णय घेतात. या सगळ्या गोंधळात पंचम इलायचीवरील प्रेम, पिंटू पुरुष असणे अशा सगळ्याच गोष्टींची कबुली मुरारीसमोर देतो. यामुळे इलायची हादरून जाते. त्यानंतर काय घडते, हे पाहण्यासाठी मालिका पहा.
या गमतीशीर कथानकाबद्दल पंचमची भूमिका साकारणारा निखिल खुराणा म्हणाला, धूमकेतूच्या भागाचे चित्रीकरण म्हणजे धमाल होती. सगळे कलाकार एकत्र असताना चित्रीकरण करताना नेहमीच मजा येते. कथानकाच्या पार्श्वभूमीला उल्कापात असल्याने गंमत आणखीच वाढली. पंचम अखेर मुरारीसमोर इलायचीवरील प्रेमाची कबुली देतो आणि आपले गुपित उघड करतो.
पिंटूची भूमिका साकारणारा हरवीर सिंग म्हणाला, उल्कापाताच्या या कथानकातून एक सुंदर संदेश मिळतो की, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी कधीही विशिष्ट वेळेची वाट पाहू नका. आजवर इलायचीवरील प्रेम लपवणा-या पंचमला या प्रेमाची मुरारीसमोर कबुली देण्यासाठी कारण मिळाले आहे. प्रेक्षकांनी हा भाग पहावा आणि मुरारी या सगळ्यावर काय प्रतिक्रिया देतो, हे पहावे.

Web Title: Pancham revealed his secret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.