निया शर्माचा हॉट अंदाजातला 'टायटॅनिक' लुक आला समोर,व्हायरल झाला Video

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 03:23 PM2018-09-03T15:23:09+5:302018-09-03T15:26:36+5:30

उपस्थितांच्या नजरांसह कॅमे-याच्या नजरा आपल्याकडे कशा राहतील याची ती विशेष काळजी घेत असली तरीही 'ट्विस्टेड 2' या वेब सीरिजच्या ट्रेलर लॉन्चवेळी ड्रेसमुळेच ती खूप नर्व्हस दिसली होती.

Nia Sharma's Hot Titanic Look At Switzerland | निया शर्माचा हॉट अंदाजातला 'टायटॅनिक' लुक आला समोर,व्हायरल झाला Video

निया शर्माचा हॉट अंदाजातला 'टायटॅनिक' लुक आला समोर,व्हायरल झाला Video

googlenewsNext

टेलिव्हिजन सेन्सेशन निया शर्मा सध्या काय करते ? हा प्रश्न पडणा-यांसाठी ती सध्या व्हॅकेशन एन्जॉय करण्यात बिझी आहे. निया सध्या स्विट्जरलैंडमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. तिच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तिने काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती पुलशेजारी बिकीनमध्ये दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये निया तिच्या हॉटेलच्या रुममध्ये दिसते आहे.निया तिच्या बोल्ड अंदाजासाठी नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तिचे अनेक फोटो शेअर करत असते. 

व्हीडीओत नेहाने पिंक कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोत ती अतिशय ग्लॅमरस दिसत असून तिचा हा अंदाजही तिच्या फॅन्सचे लक्ष वेधून घेत आहे. निया तिच्या स्टाइल स्टेटमेंटसाठीही ओळखली जाते. हटके ड्रेसिंग स्टाईल नियाला पसंत आहे. मात्र हेच डिझायनर ड्रेस नियासाठी डोकेदुखीही ठरतानेच अनेकवेळा पाहायला मिळते. उपस्थितांच्या नजरांसह कॅमे-याच्या नजरा आपल्याकडे कशा राहतील याची ती विशेष काळजी घेत असली तरीही  ट्विस्टेड 2' या वेब सीरिजच्या ट्रेलर लॉन्चवेळी ड्रेसमुळेच ती खूप नर्व्हस दिसली होती.

 

२७ वर्षांची निया शर्मा टीव्हीवरची सर्वाधिक बोल्ड अन ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून परिचित आहे. निया शर्माने आपल्या करिअरची सुरुवात ‘काली’ या टीव्ही शोमधून केली होती. ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिला ख-या अर्थाने लोकप्रियता मिळाली. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली.यापाठोपाठ ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही अनेक धोकादायक स्टंट करताना नियाला प्रेक्षकांनी पाहिले. निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर निया कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. गतवर्षी ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यादीत निया तिस-या स्थानावर होती.   
निया सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. तिचा प्रत्येक प्रोजक्ट असो किंवा मग काही अक्टीव्हीटी ती तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते. तिचे हेच मादक सौदर्य बघून तिला सोशल मीडियावर भरपुर लाईक्स आणि कमेंटस मिळतात. 

Web Title: Nia Sharma's Hot Titanic Look At Switzerland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.