रामा देणार गुड न्यूज, लवकरच येणार 'छोटा पाहुणा'?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 11:08 AM2018-07-03T11:08:04+5:302018-07-03T11:12:13+5:30

तेनाली रामामध्ये आता अनेक वळणं येणार आहेत. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की रामा आणि त्याच्या पत्नीला खोटी ओटीभरण्याचा कार्यक्रम पार पाडावा लागणार आहे.

New twist In Tenali Rama Tv Serial | रामा देणार गुड न्यूज, लवकरच येणार 'छोटा पाहुणा'?

रामा देणार गुड न्यूज, लवकरच येणार 'छोटा पाहुणा'?

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील 'तेनाली रामा' ही ऐतिहासिक विनोदी मालिका बच्चेकंपनीसह सा-यांच्याच पसंती पात्र ठरत आहे. मालिकेतील मुख्य पात्र म्हणजेच विनोदी रामा नेहमीच सर्व समस्यांचं निराकरण करतो. कठीणातील कठीण प्रसंगातून मार्ग काढण्याच्या त्याच्या शैलीमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात आणि त्यांना गुंतवून ठेवण्यात त्याला कधीही अपयश आलेले नाही.

आगामी भागात, आणखी एक नाट्य घडणार आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांचे बरेच मनोरंजन होणार आहे. शारदा (प्रियंवदा कांत) एक लहानगा पाहुणा येणार असल्याचे बोलताना अम्मा (निमिषा वखारिया) ऐकते आणि तिला हा छोटा पाहुणा म्हणजे बाळ असे वाटते.गंमत म्हणजे शारदा कुत्र्याचे पिल्लू आणण्याबद्दल बोलत असते. शारदाची तब्येत बिघडल्यानंतर अम्माच्या शंका आणखीन वाढते. 

दरम्यान, रामा आणखी एक गूढ उकलतो आणि त्याचे बक्षीस म्हणून जेव्हा कधी त्याची बायको शारदा गरोदर असेल तेव्हा तिचा ओटीभरण्याचा कार्यक्रम करण्याचे वचन कृष्णदेवराय देतो.अम्मा ही आनंदाची बातमी रामाला सांगते. ही बातमी ऐकून अतिशय आनंदित झालेला रामा दरबारातील प्रत्येकाला आपली बायको गरोदर असल्याचे सांगतो. मात्र, नंतर त्याला कळते की असे काहीही नाही. पण, अम्मा फारच आनंदी आहे, तिला सत्य सांगू नये, असे रामा शारदाला सुचवतो. दुष्ट तथाचार्य (पंकज बेरी) हे ऐकतो आणि राजाने राजमहालात आयोजित केलेल्या ओटीभरण्याच्या कार्यक्रमात रामाचा अपमान करण्याची योजना आखतो. मात्र, नेमकी त्याचवेळी शारदा चक्कर येऊन पडते.सत्य बाहेर काढण्यात तथाचार्य यशस्वी होईल का? या परिस्थितीतून बाहेर पडणं रामाला शक्य होईल का? शारदा खरंच गरोदर आहे का? या कथानकाबद्दल तेनाली रामा साकारणारा कृष्णा भारद्वाज म्हणाला, "तेनाली रामामध्ये आता अनेक वळणं येणार आहेत. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की रामा आणि त्याच्या पत्नीला खोटी ओटीभरण्याचा कार्यक्रम पार पाडावा लागणार आहे. या सगळयाचा सामना रामा कसा करणार, हे पाहणं उत्सुकतेचं  ठरणार आहे. "
 

Web Title: New twist In Tenali Rama Tv Serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.