बीचवाले – बापू देख रहा है या मालिकेत अशी होणार बॉबी बीचवाले आणि त्याच्या कुटुंबियांची फजिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 03:44 PM2018-11-01T15:44:14+5:302018-11-01T20:10:45+5:30

बॉबी बीचवाले आपल्या संपूर्ण कुटुंबियांना पट्टायाला घेऊन जायचा विचार करणार आहे आणि त्यासाठी सुट्टीची योजना करण्‍यासाठी पॅरिस सिंग नावाच्‍या ट्रॅव्‍हेल एजंटशी संपर्क साधणार असल्याचे मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

New Twist in beechwale bapu dekh raha hai | बीचवाले – बापू देख रहा है या मालिकेत अशी होणार बॉबी बीचवाले आणि त्याच्या कुटुंबियांची फजिती

बीचवाले – बापू देख रहा है या मालिकेत अशी होणार बॉबी बीचवाले आणि त्याच्या कुटुंबियांची फजिती

googlenewsNext

सोनी सबवरील 'बीचवाले' या मालिकेला देशभरातील प्रेक्षकांकडून प्रचंड लोकप्रियता आणि प्रेम मिळत आहे. ही मालिका मध्‍यमवर्गीय भारतीय कुटुंबाचे संघर्ष, आकांक्षा, सेलिब्रेशन्‍स आणि सामाजिक दबावांना सादर करते. ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिकेच्‍या आगामी एपिसोडमध्‍ये बीचवाले कुटुंब एकत्र परदेश दौऱ्यावर जाण्‍याची योजना आखत आहे.
 
बॉबी बीचवाले (जाकिर हुसैन) आपल्या संपूर्ण कुटुंबियांना पट्टायाला घेऊन जायचा विचार करणार आहे आणि त्यासाठी सुट्टीची योजना करण्‍यासाठी पॅरिस सिंग नावाच्‍या ट्रॅव्‍हेल एजंटशी संपर्क साधणार आहे. त्यांच्याकडे पैशांविषयी देखील विचारपूस करणार आहे. बीचवाले कुटुंब त्‍यांच्‍या या ट्रिपबाबत जाणून घेण्‍यास खूपच उत्‍सुक असून याबाबत ते शेजारच्‍या लोकांना देखील सांगणार आहेत. पण कुटुंबाचा हा उत्‍साह फार काळ टिकून राहणार नाहीये. कारण बॉबीला त्‍याच्‍या गॅरेजमधून एक कार चोरीला गेल्‍याचा कॉल येणार आहे आणि पोलिस चोराची चौकशी करणार असल्‍यामुळे त्यांच्या कुटुंबाला ही ट्रिप रद्द करावी लागणार आहे.
 
शेजाऱ्यांसमोर कुटुंबाची फजिती होऊ नये म्‍हणून चतुर ट्रॅव्‍हेल एजंट त्‍यांना एका अॅपचा उपयोग करण्‍याचा सल्‍ला देणार आहे. या अॅपमधून प्रोफाइल पिक्‍चर्ससाठी वेगवेगळ्या ठिकाणांचे खोटे बॅकग्राऊण्‍ड्स बनवता येतात असे त्यांना सांगितले जाणार आहे. बीचवाले कुटुंब सोशल मीडियावर हे फोटो टाकून लोकांना मूर्ख बनवणार का? हे प्रेक्षकांना या मालिकेच्या आगामी भागातच पाहायला मिळणार आहे. याविषयी बॉबी बीचवालेची भूमिका साकारणारा जाकिर हुसैन सांगतो, 'बॉबी बीचवालेची भूमिका साकारताना खूप मजा येते. तो नेहमीच हास्‍यमय घटनांमध्‍ये अडकतो. आगामी एपिसोडमध्‍ये बीचवाले कुटुंब परदेशी दौऱ्याबाबत शेजाऱ्यांसमोर बढाई मारताना दिसणार आहेत. पण हा दौरा रद्द होणार असून ते खोट्या फोटोंसह सोशल मीडियावरील त्‍यांच्‍या मित्रांना आपण परदेशी दौऱ्यावर असल्‍याचे सांगणार आहे. हा भाग पाहाताना प्रेक्षक खळखळून हसणार यात काहीच शंका नाही.' 

'बीचवाले – बापू देख रहा है' ही मालिका दर सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता सोनी सबवर प्रेक्षकांना पाहायला मिळते. 

Web Title: New Twist in beechwale bapu dekh raha hai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.