रसिकांच्या भेटीला नवी मालिका ‘साथ दे तू मला’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 04:02 PM2019-02-08T16:02:19+5:302019-02-08T16:02:34+5:30

प्राजक्ताला तिची स्वप्न पूर्ण करण्यात कशी आणि कुणाकुणाची साथ मिळणार याची रंगतदार गोष्ट ‘साथ दे तू मला’ मधून उलगडेल. नवोदित अभिनेत्री प्रियांका तेंडुलकर या मालिकेतून पदार्पण करत आहे.

A new series 'Saath De Tu Mala | रसिकांच्या भेटीला नवी मालिका ‘साथ दे तू मला’

रसिकांच्या भेटीला नवी मालिका ‘साथ दे तू मला’

googlenewsNext

छोट्या पडद्यावर मालिका नेहमीच रसिकांचे मनोरंजन करतात. अशीच एक हटके गोष्ट लवकरच नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेचं नाव आहे 'साथ दे तू मला'. आपली स्वप्न पूर्ण करु पाहणाऱ्या एका मुलीची गोष्ट या मालिकेतून पाहायला मिळेल. ही गोष्ट आहे प्राजक्ताची. फॅशन डिझायनर बनण्याची इच्छा असणाऱ्या प्राजक्ताला आपल्या क्षेत्रात खूप नाव कमवायचंय अगदी लग्नानंतरसुद्धा. करिअरसाठी सबकुछ कुर्बान असं मानणाऱ्यातली ती नाही. घर-संसार सांभाळून तिला तिच्या स्वप्नांना गवसणी घालायची आहे. खरंतर घर आणि ऑफिस अशी तारेवरची कसरत कुशलरित्या सांभाळणाऱ्या तमाम स्त्रियांचं प्राजक्ता प्रतिनिधित्व करते आणि म्हणूनच ‘साथ दे तू मला’ या मालिकेची गोष्ट प्रत्येकाला आपलीशी वाटेल.

 

प्राजक्ताला तिची स्वप्न पूर्ण करण्यात कशी आणि कुणाकुणाची साथ मिळणार याची रंगतदार गोष्ट ‘साथ दे तू मला’ मधून उलगडेल. नवोदित अभिनेत्री प्रियांका तेंडुलकर या मालिकेतून पदार्पण करत आहे. तर आशुतोष कुलकर्णी, सविता प्रभुणे, रोहन गुजर, प्रिया मराठे, पियुष रानडे अशी तगडी स्टारकास्ट या मालिकेतून पाहायला मिळेल. 'साथ दे तू मला' या मालिकेतूनही सगळ्यांच्याच मनातला प्रश्न मांडण्यात येणार आहे. हळूवार नातं उलगडणारी ही खूप सुंदर गोष्ट असून रसिकांचे मनोरंजन करण्यात मालिका यशस्वी ठरले असे या मालिकेच्या टीमला विश्वास आहे.’


 

Web Title: A new series 'Saath De Tu Mala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.