'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय जुगारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 07:15 AM2018-11-14T07:15:00+5:302018-11-14T07:15:00+5:30

येत्या भागामध्ये मुरारी जुगाराचा व्यसनी झाला आहे आणि जुगारापायी त्याने अनेक आवडत्या गोष्टी गमावल्या आहेत.

Murari becomes a gambler in Jijaji Chhat Per Hain | 'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय जुगारी

'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय जुगारी

googlenewsNext
ठळक मुद्देमुरारी जुगाराचा व्यसनी झालायइलायची मुरारीचे व्यसन सोडवण्यासाठी आखते योजना

सोनी सबवरील 'जिजाजी छत पर है' या मालिकेने आकर्षक वळणे आणि धमाल पात्रांच्या साहाय्याने प्रेक्षकांची नेहमीच करमणूक केली आहे. इलायची (हिबा नवाब), मुरारी (अनुप उपाध्याय) आणि पंचम (निखिल खुराना) अशी धमाल पात्रे या मालिकेत समाविष्ट आहेत. ही मालिका दिवाळी स्पेशल ट्रॅक घेऊन आली आहे आणि प्रेक्षकांना खास सरप्राइजही देणार आहे. येत्या भागामध्ये मुरारी जुगाराचा व्यसनी झाला आहे आणि जुगारापायी त्याने अनेक आवडत्या गोष्टी गमावल्या आहेत.

चांदणी चौक पूर्णपणे दिवाळीमय झालेला आहे. प्रत्येक ठिकाणी आनंदोत्सव साजरा होतो आहे. या सणानिमित्त मुरारी इतर लोकांबरोबर पत्ते खेळायला बसतो आणि त्याचे त्याला व्यसनच लागते. इलायचीला मुरारीच्या याची खबर लागते आणि ती मुरारीचं व्यसन सोडवण्यासाठी एक योजना आखते. इलायची कुटुंबातल्या पंचमसह इतर लोकांबरोबर एक धमाल करायची ठरवते, यामुळे मुरारीला जुगारापायी केवढे नुकसान होते ते कळणार आहे.
मुरारीची भूमिका साकारणारे अनुप उपाध्याय म्हणाले की, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळी फार मोठा सण आहे आणि 'जिजाजी छत पर है' मालिकेच्या आगामी भागात अस्सल सणाचा आनंत पत्ते खेळण्यात, जुगारात नाही हे लोकांना समजणार आहे, या प्लॉटमधून प्रेक्षकांची धमाल करमणूकही होणार आहे.
इलायचीची भूमिका साकारणाऱ्या हिबा नवाब म्हणाल्या की, 'मला दिवाळी हा सण नेहमीच आवडतो. वर्षातल्या सर्वात अंधाऱ्या रात्री संपूर्ण शहर दिव्यांच्या रोषणाईने सजलेले असते. आमच्या मालिकेच्या प्रेक्षकांना येणारा भाग नक्कीच आवडणार आहे. या भागात इलायची आपल्या वडिलांचं व्यसन कशाप्रकारे
सोडवते ते दिसणार आहे.'
 

Web Title: Murari becomes a gambler in Jijaji Chhat Per Hain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.