​मनीष पॉल करणार इंडियन आयडल १० चे सूत्रसंचालन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 09:04 AM2018-05-22T09:04:29+5:302018-05-22T14:34:29+5:30

सोनी वाहिनीवरील इंडियन आयडलचे आजवरचे अनेक सिझन हिट ठरले आहेत. या कार्यक्रमाने आजवर एकापेक्षा एक गुणी गायक बॉलिवूड इंडस्ट्रीला ...

Manish Paul, the Indian Idol 10's comedian | ​मनीष पॉल करणार इंडियन आयडल १० चे सूत्रसंचालन

​मनीष पॉल करणार इंडियन आयडल १० चे सूत्रसंचालन

googlenewsNext
नी वाहिनीवरील इंडियन आयडलचे आजवरचे अनेक सिझन हिट ठरले आहेत. या कार्यक्रमाने आजवर एकापेक्षा एक गुणी गायक बॉलिवूड इंडस्ट्रीला मिळून दिले आहेत. आज हे गायक बॉलिवूडमध्ये आपली एक जागा निर्माण करत आहेत. या कार्यक्रमाचा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या कार्यक्रमाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे.
देशातील सर्वात मोठा गायनाचा रिअॅलिटी शो म्हणून इंडियन आयडॉलकडे पाहिले जाते. या कार्यक्रमाचा दहावा सिझन सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाने भारताला प्रतिभावंत गायक दिले असून यंदाचा सिझन देखील आजवरच्या इतर सिझनसारखा दमदार असणार आहे. या सिझनसाठी प्रतिभावान आणि धडाडीचा कलाकार मनीष पॉल याला सूत्रसंचालक म्हणून घेण्यात आले आहे. उत्स्फूर्तता आणि आपल्या विनोदाच्या टायमिंगसाठी प्रसिद्ध असलेला मनीष आपल्या मोहिनीने धमाल उडवून देण्यासाठी सज्ज झाला आहे. तो लोकांचे लक्ष नक्कीच वेधून घेईल अशी कार्यक्रमाच्या टीमला खात्री आहे. याविषयी मनीष पॉल सांगतो, “इंडियन आयडलसाठी मी पहिल्यांदाच सूत्रसंचालक म्हणून काम करणार आहे. गायनाच्या रिअॅलिटी शोसाठी देखील सूत्रसंचालन करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. इंडियन आयडलचे सूत्रसंचालन करायला मिळत असल्याने मी खूपच खूश असून या कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यासाठी खूपच उत्सुक आहे. गायकांना योग्य मंच मिळवून देणारा हा प्लॅटफॉर्म असून या मंचाने भारतीय संगीत उद्योगाला अनेक प्रतिभावान गायक दिले आहेत. आजवरच्या इतर सिझनप्रमाणे या कार्यक्रमाचा हा सिझन देखील तितकाच दमदार असेल अशी मला खात्री आहे. नेहा कक्कड, विशाल दादलानी आणि अनू मलिक हे उत्तम परीक्षक आणि मार्गदर्शक आहेत. त्यामुळे या कार्यक्रमातील स्पर्धकांना त्यांच्या मार्गदर्शनाचा नक्कीच फायदा होईल. गाण्याशी आणि संगीताशी माझा जवळचा संबंध असल्यामुळे गायनाच्या क्षेत्रातील लोकांसोबत राहण्यासाठी हा एक उत्तम मंच ठरेल. मी उत्सुकतेने कार्यक्रम सुरू होण्याची वाट पाहत आहे. 
‘खबर फैला दो’ हा प्रचार संदेश असलेल्या इंडियन आयडालच्या दहावा सिझनचे ऑडिशन होतकरू आणि प्रतिभावंत गायकांसाठी विविध शहरांतील केंद्रांवर लवकरच सुरू होणार आहेत. 

Also Read : इंडियन आयडलची ही पूर्व स्पर्धक बनणार आता इंडियन आयडलची परीक्षक

Web Title: Manish Paul, the Indian Idol 10's comedian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.