मानसी साळवीचे वाढले नखरे! निर्मात्यांसाठी ठरते डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 03:24 PM2018-08-31T15:24:32+5:302018-09-02T07:15:00+5:30

आपण काही तरी खूप मोठं केलं आहे, स्टार झालो आहोत अशी भावना त्यांच्यात वाढू लागते. अवघ्या काही दिवसांत स्टारडम आल्यानं आपल्यापुढे इतर व्यक्ती कुणीच नाही असं त्यांना वाटू लागते.अ

Manasi Salvi grew up! Frustrations for makers are frustrating | मानसी साळवीचे वाढले नखरे! निर्मात्यांसाठी ठरते डोकेदुखी

मानसी साळवीचे वाढले नखरे! निर्मात्यांसाठी ठरते डोकेदुखी

googlenewsNext

इंडस्ट्रीत प्रत्येक कलाकाराला स्टारडम हे हवं असतं त्याशिवाय त्याची गाडी यशाच्या मार्गावर सुसाट धावूच शकत नाही.....किती तरी येतात. आणि जातात...पण स्टार डम मिळवणं हे खूपचं कठीण असतं....हे अनेकांना कळालेलं नाही. इंडस्ट्रीत थोडं यश मिळालं की कलाकार हुरळून जातात. आपण काही तरी खूप मोठं केलं आहे, स्टार झालो आहोत अशी भावना त्यांच्यात वाढू लागते. अवघ्या काही दिवसांत स्टारडम आल्यानं आपल्यापुढे इतर व्यक्ती कुणीच नाही असं त्यांना वाटू लागते.असेच काहीसे सध्या अभिनेत्री मानसी साळवीच्या वागण्यामुळे चर्चा सुरू आहे.  


एकामागोमाग एक मालिकांतून उत्कृष्ट अभिनय करून अभिनेत्री मानसी साळवीने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. मानसी साळवी आता ‘स्टार भारत’वरील ‘पापा बाय चान्स’ या नव्या मालिकेत आईच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. मालिकेत नायक असलेला युवानच्या (झेब्बीसिंग) च्या आईची भूमिका मानसी साकारत आहे. या नव्या भूमिकेबद्दल मानसी खूपच आनंदी आहे. एकीकडे मानसी साळवीच्या भूमिकेचे कौतुक होत असताना दुसरीकडे मात्र तरी सुत्रांनुसार तिचे मालिकेतील अन्य सहकलाकारांबरोबर फारसे पटत नसल्याचे माहिती मिळते आहे.इतकेच नाहीतर मालिकेच्या सेटवर ती अन्य कलाकारांसह बोलतही नाही. 

शूटिंगमधून वेळ मिळताच सगळे कलाकार एकत्र गप्पा मारताना दिसतात.  पण मानसी त्यांच्याबरोबर रहात नाही आणि ती आपल्या व्हॅनमध्ये जाऊन बसते. मानसीला आपल्याबरोबर राहायला आणि बोलायला आवडत नाही, ही गोष्ट आता इतर कलाकारांच्या लक्षात आली आहे. या मालिकेत प्रसिध्द नाव असलेली तीच एकमेव कलाकार असून इतर अभिनेते हे तुलनेने नवखे आहेत. त्यामुळे मानसी त्यांच्यात मिळून मिसळून राहात नाही आणि ती व्हॅनमध्ये एकटीच जेवण घेते. इतकेच नव्हे, तर सूत्रांच्या सांगण्यानुसार मानसी पहिल्या भागाच्या स्क्रीनिंगलाही उपस्थित राहिली नव्हती. या मालिकेच्या पहिल्याच भागाच्या प्रदर्शनाला सर्व कलाकार व कर्मचारी उपस्थित होते, पण फक्त मानसी साळवी गैरहजर होती.त्यामुळे मानसी साळवीच्या अशा वागण्याने इतर कलाकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. या मालिकेत  सना सय्यद, जीतेन लालवाणी आणि इशान्त भानुशाली हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.

Web Title: Manasi Salvi grew up! Frustrations for makers are frustrating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.