'लाडो' फेम अभिनेत्री पलक जैन अडकणार या अभिनेत्यासह लग्नबंधनात.'या' तारखेला होणार पारंपारीक पद्धतीने विवाहसोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 09:00 PM2019-02-01T21:00:00+5:302019-02-01T21:00:00+5:30

पलक आणि तपस्वीचे पारंपारीक पद्धतीने विवाहसोहळा इंदौरमध्ये पार पडणार आहे. पलकची हळदी, मेहंदी आणि संगीत सेरेमनचे आयोजन 7,8,9 फेब्रुवारीला होणार आहे.

Laado 2 Actress Palak Jain And Tapasvi Mehta kickstart Pre-wedding Festivities. See Inside Pics | 'लाडो' फेम अभिनेत्री पलक जैन अडकणार या अभिनेत्यासह लग्नबंधनात.'या' तारखेला होणार पारंपारीक पद्धतीने विवाहसोहळा

'लाडो' फेम अभिनेत्री पलक जैन अडकणार या अभिनेत्यासह लग्नबंधनात.'या' तारखेला होणार पारंपारीक पद्धतीने विवाहसोहळा

googlenewsNext

टीव्ही अभिनेत्री पलक जैन लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. बॉयफ्रेंड तपस्वी मेहतासोबत 10 फेब्रुवारीला लग्न करत आपल्या आयुष्याची नवी इनिंग सुरू करणार आहे. पकलच्या लग्नाचे प्री-वेडिंग सेलिब्रेशनही सुरू झाले आहेत. पलकच्या सेलिब्रेशनला नातेवाईकांसह टीव्ही इंडस्ट्रीतले कलाकारमंडळी सुयश राय, किश्वर मर्चेंट, कुणाल जयसिंह, रोनित रायसोबतच अनेक सेलेब्स उपस्थित होते. पलक आणि तपस्वीचे पारंपारीक पद्धतीने विवाहसोहळा इंदौरमध्ये पार पडणार आहे. पलकची हळदी, मेंदी आणि संगीत सेरेमनचे आयोजन 7,8,9 फेब्रुवारीला  होणार आहे.


यावेळी अनेक टीव्ही सेलेब्स उपस्थित असल्याची शक्यता आहे. पलकचे प्रि-सेलिब्रेशन फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पलक जैन 'लाडो' मालिकेत झळकत आहे. या आधी 'परवरिश' मालिकेतही ती झळकली होती. विशेष म्हणजे तपस्वी आणि पलक हे दोघेही गेल्या 8 वर्षापासून एकमेकांना ओळखतात. जेव्हा पलकने तपस्वीला पाहिले होते तेव्हाच ती त्याच्या प्रेमात पडली होती. त्यानंतर हळु हळु त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीेच रूपांतर प्रेमात झाले.  दोघांच्याही आवडी- निवडी जुळत असल्यामुळे आता त्यांनी लग्नबंधनात अडकल्याचा निर्णय घेतला आहे. 

 

विशेष म्हणजे पलकप्रमाणेच आणखी काही टीव्ही अभिनेत्री या वर्षी लग्नबंधनात अडकणार आहे. टीव्ही शो 'साथ निभाना साथिया' मालिकेत किंजलची भूमिका साकारणारी फिरोजा खानदेखील बॉयफ्रेंड आणि दुबईच्या रियल स्टेट बिजनेसमॅन सोहेल खंडवानीसोबत लवकरच लग्न करणार आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है'ची अभिनेत्री मोहिना कुमारी सिंह फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात लग्न करणार आहे. त्यामुळे आया मौसम प्यार का असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. 

Web Title: Laado 2 Actress Palak Jain And Tapasvi Mehta kickstart Pre-wedding Festivities. See Inside Pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.