कर्णसंगिनीमध्ये सयंतानी घोष साकारणार कुंतीची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 12:05 PM2018-09-18T12:05:36+5:302018-09-19T06:30:00+5:30

महाभारताच्या पार्श्वभूमीवरील स्टारप्लसवरील नवीन मालिका कर्णसंगिनीमध्ये कर्ण आणि त्याची पत्नी उरूवी यांची कधीही सांगण्यात न आलेली कथा आहे.

Kunti plays the role of singer in Saaransani Ghosh | कर्णसंगिनीमध्ये सयंतानी घोष साकारणार कुंतीची भूमिका

कर्णसंगिनीमध्ये सयंतानी घोष साकारणार कुंतीची भूमिका

googlenewsNext
ठळक मुद्देकर्णसंगिनी' या मालिकेची निर्मिती भव्य प्रमाणात केली जाणार आहे

महाभारताच्या पार्श्वभूमीवरील स्टारप्लसवरील नवीन मालिका कर्णसंगिनीमध्ये कर्ण आणि त्याची पत्नी उरूवी यांची कधीही सांगण्यात न आलेली कथा आहे. महाभारतातील युद्ध आणि राजकारणाबद्दल सर्वांनाच माहिती असताना ही मालिका महाभारतातील दुर्दैवी नायक कुंतीपुत्र कर्ण, त्याची पत्नी आणि अर्जुन यांची कथा यांच्याकडे नव्याने पाहणार आहे.

स्टारप्लसवरील महाभारतात २०१३ मध्ये सत्यवतीची भूमिका सयंतानीने साकारल्यानंतर निर्मात्यांनी पुन्हा एकदा तिला कर्णसंगिनीमध्ये कुंतीच्या रूपात घेतले आहे. आधीच्या महाभारतामधील केवळ तिलाच पुन्हा ह्या नवीन मालिकेत घेण्यात आले असून त्यासाठी ती स्वतःला अतिशय भाग्यवान समजते. महाभारता मालिकेतही तिची भूमिका मध्यवर्ती होती. ह्यावेळेसही ती कर्णाची आई कुंतीची महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. आम्हाला तुला या व्यक्तिरेखेमध्ये पाहण्याची अतिशय उत्सुकता आहे.

'कर्णसंगिनी' या मालिकेची निर्मिती भव्य प्रमाणात केली जाणार असून त्यातून त्या काळातील भव्यता दिसून येणार आहे. तसेच एकापेक्षा एक दर्जेदार कलाकार या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत, ही सुद्धा या मालिकेची जमेची बाजू म्हणावी लागेल. आपल्या देखणेपणामुळे प्रसिद्ध असलेला अभिनेता गौतम गुलाटी हा या मालिकेत महत्त्वाची भूमिका रंगवणार आहे. या भूमिकेसाठी तो खूपच उत्सुक आहे. त्याचे हवेहवेसे व्यक्तिमत्त्व, सहज वावर आणि देखणेपणामुळे त्याला या मालिकेत दुर्योधनाच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले आहे आणि त्याने देखील यासाठी होकार दिलेला आहे.

Web Title: Kunti plays the role of singer in Saaransani Ghosh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.