'कॉफी विथ करण' शोमध्ये पहिले धडकणार जान्हवी व ईशान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 12:33 PM2018-08-03T12:33:39+5:302018-08-03T12:42:16+5:30

अभिनेता ईशान खट्टर व अभिनेत्री जान्हवी कपूरचा नुकताच 'धडक' चित्रपटाने शंभर कोटींचा पल्ला गाठला आहे.

Jahnavi and Ishaan will be the first to fall in the coffee with Karan Show | 'कॉफी विथ करण' शोमध्ये पहिले धडकणार जान्हवी व ईशान

'कॉफी विथ करण' शोमध्ये पहिले धडकणार जान्हवी व ईशान

googlenewsNext
ठळक मुद्देजगभरातील प्रेक्षकांचे धडक चित्रपटाने जिंकले मन

अभिनेता ईशान खट्टर व अभिनेत्री जान्हवी कपूरचा नुकताच 'धडक' चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट मराठी सिनेमा 'सैराट'चा रिमेक आहे. या रिमेकलाही प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने शंभर कोटींचा पल्ला गाठला आहे. या चित्रपटातून जान्हवीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि ईशानचा हा दुसरा सिनेमा आहे. हे दोघे करण जोहर सूत्रसंचालन करत असलेला चॅट शो 'कॉफी विद करण'मध्ये हजेरी लावणार असल्याचे बोलले जात आहे. 'कॉफी विद करण'चा यंदा सहावा सीझन आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार ईशान आणि जान्हवी करण जोहरचा चॅट शो 'कॉफी विद करण'मध्ये दिसणार आहेत. करणचा हा चॅट शो खासगी व बुचकाळ्यात पाडणाऱ्या प्रश्नांसाठी प्रसिद्ध आहेत. जान्हवी व ईशानच्या धडक चित्रपटाची निर्मिती करण जोहरने केली आहे आणि दिग्दर्शन शशांक खेतानने केली आहे. नुकतेच करण जोहरने 'धडक'बद्दल सांगितले की, 'जगभरातील प्रेक्षकांचे धडक चित्रपटाने मन जिंकले आहे. जगभरातून शंभर कोटींहून अधिक कमाई या सिनेमाने केली. नवोदीत कलाकारांसोबत बनवलेल्या चित्रपटाला यश मिळणे ही काही मोठी बाब नाही. जान्हवी व ईशान तुमच्यावर मला गर्व आहे.'
 जान्हवी आपल्या होम प्रॉडक्शनच्या चित्रपटात दिसणार आणि पापा बोनी कपूर यांनी जान्हवीसाठी काही खास प्लानिंग केले आहे, असे कानावर आले होते. आता खरे काय, हे लवकरच कळेल़ तोपर्यंत प्रतीक्षा ही आलीच. तूर्तास बोनी कपूर यांनी याबाबतचा प्लान उघड केलेला नाही. पण जान्हवीसाठी एका चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ‘जान्हवीचा दुसरा चित्रपट तिच्या ‘धडक’ इमेजच्या अगदी वेगळा असावा, असे त्यांचे मत आहे. 'कॉफी विद करण'मध्ये जान्हवी व ईशान यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. 

Web Title: Jahnavi and Ishaan will be the first to fall in the coffee with Karan Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.