Friendship Day 2018: कलाकारांनी दिला मैत्रिच्या आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2018 03:30 PM2018-08-04T15:30:09+5:302018-08-05T07:15:00+5:30

 मैत्रिचं नातं हे वेगवेगळ्या प्रकारे खास असतं. हे अशाप्रकारचं नातं आहे जे प्रत्येकाच्याच आयुष्यात असतं.  खरं तर ज्या गोष्टी आपण परिवारातील इतर सदस्यांबरोबर शेअर करीत नाही, त्या गोष्टी आपण आपल्या जीवलग मित्राबरोबर शेअर करीत असतो.

Friendship Day 2018: artist remember their good memories about friendship days | Friendship Day 2018: कलाकारांनी दिला मैत्रिच्या आठवणींना उजाळा

Friendship Day 2018: कलाकारांनी दिला मैत्रिच्या आठवणींना उजाळा

googlenewsNext

 मैत्रिचं नातं हे वेगवेगळ्या प्रकारे खास असतं. हे अशाप्रकारचं नातं आहे जे प्रत्येकाच्याच आयुष्यात असतं.  खरं तर ज्या गोष्टी आपण परिवारातील इतर सदस्यांबरोबर शेअर करीत नाही, त्या गोष्टी आपण आपल्या जीवलग मित्राबरोबर शेअर करीत असतो. अशा या अनोख्या नात्याचा उत्साह ‘फ्रेंडशिप डे’च्या दिवशी झी टीव्हीवरील कलाकार साजरे करतायेत.  

 

झी टीव्हीवरील इश्क सुभान अल्लामधील कबीर ऊर्फ अदनान खान म्हणाला, “व्यक्तिशः मला असं वाटत नाही की मैत्री साजरी करण्यासाठी एखाद्या खास दिवसाची गरज असते. आपले दोस्त खास आहेत हे त्यांना सांगण्यासाठी रिमाईंडरची गरज नाही. माझा ऑफस्क्रीन आणि ऑनस्क्रीन दोस्त आशुतोष सेमवाल असून तो ह्या मालिकेत काम करत आहे. तो मला चांगला ओळखतो आणि अगदी माझ्या मनातील गोष्ट जाणू शकतो. काही वेळा तर मी काहीही न बोलतासुद्धा मला काय वाटत आहे किंवा मी कुठल्या परिस्थितीतून जात आहे हे त्याला कळते. जेव्हा कधी आशुतोषला जाणवतं की मी निराश आहे, तेव्हा तो मला सांगतो,“ब्रो तू तुला मिळालेले आशिर्वाद मोज, चुका नको. चांगल्या गोष्टी किती आहेत ते बघ आणि वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष कर.” त्याचे शब्द मला पुन्हा एक नवीन ऊर्जा देतात आणि माझा मूड छान होतो. तो अतिशय सकारात्मक असून सेटवरील सगळ्‌यात चांगला व्यक्ती आहे.”

 

 कुंडली भाग्यमधील रिषभ लुथ्रा ऊर्फ मनित जौरा म्हणाला, “दोस्त हे नेहमीच खास असतात कारण त्यांना निवडण्याचा हक्क तुमच्याकडे असतो. सेटवर माझे सगळ्‌यांचीच तसे छान जमते पण माझे सहकलाकार धीरज धूपार आणि श्रद्धा आर्या यांच्यासोबत माझे सगळ्‌यात जास्त जमते. धीरज माझा दोस्त आहे आणि आमचे नाते छान आहे. आम्ही सीन्ससाठीसुद्धा एकमेकांना मदत करतो. श्रद्धा माझ्यासाठी माझा सगळ्‌यात मोठा आधार आहे. आमच्यात खूप गोष्टी सारख्या आहेत. आम्ही अगदी खरे पंजाबी आहोत आणि आम्हांला फिरायला मनापासून आवडतं. त्यामुळे आमच्याकडे बोलण्यासारख्या खूप गोष्टी असतात. असे मस्त दोस्त मिळणे खूप कठीण आहे आणि हे दोघेही माझ्या आयुष्यात आहेत याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो.”

 

इश्क सुभान अल्लामधील झीनत ऊर्फ मोनिका खन्ना म्हणाली, “मैत्री साजरी करण्यासाठी खास दिवसाची गरज नाही. दोस्त खूप महत्त्वाचे असतात कारण ते तुमच्या सकारात्मकता आणि उत्फुल्लपणा आणतात. तुमच्यातील आत्मविश्वास त्यांच्यामुळे दुणावतो। ते तुम्हांला तुमच्या शक्ती, स्वप्ने आणि क्षमतांची जाणीव करून देतात. जेव्हा तुम्ही चुकता तेव्हा ते तुम्हांला सांगतात. खरे दोस्त आनंदात तुमच्यासोबत असतात आणि दुःखातून तुम्हांला बाहेर काढतात. त्यामुळे मला वाटतं जर मैत्री रोजच
साजरी करता येऊ शकत असेल तर केवळ फ्रेंडशिप डेलाच ती साजरी का करायची.”

इंडियाज्‌ बेस्ट ड्रामेबाझचा सूत्रधार शांतनु महेश्वरी म्हणाला, “फ्रेंडशिप केवळ एका दिवशी साजरे करणे योग्य नाही. मैत्री तर रोज साजरी करायची असते। मला अजूनही आठवतंय माझ्या शाळेच्या दिवसांमध्ये फ्रेंडशिप डे ला आम्ही सर्वांना फ्रेंडशिप बॅन्ड्‌स बांधायचो. तेव्हा मी माझ्या जवळच्या मित्रांसाठी फ्रेंडशिप बॅन्ड्‌स बनवायचो कारण फॅन्सी बॅन्ड्‌स विकत घेणे मला परवडायचे नाहीत. मी हा फ्रेंडशिप डे माझे खास दोस्त मॅसेडॉन डिमेलो आणि पालकी मल्होत्रासोबत व्यतीत करेन. आम्ही काहीवेळा अगदी छोट्‌या छोट्‌या आणि मुर्खासारख्या गोष्टीही करतो पण त्यामुळे आमचे नाते अधिकाधिक खास होत चालले आहे.”

ये तेरी गलियांमधील पुचकी ऊर्फ वृषिका मेहता म्हणाली, “माझ्या आयुष्यात दोस्ती खूप महत्त्वाची आहे. माझे दोस्त खूप कमी आहेत पण माझ्यासाठी ते सर्वोत्तम आहेत. ते माझ्या आयुष्याचा हिस्सा आहेत ह्या गोष्टीबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते. मला आठवतंय शाळेत असताना फ्रेंडशिप बॅन्ड्‌स बांधण्याचा मोठा ट्रेंड होता आणि सर्वाधिक बॅन्ड्‌स ज्याच्या हातावर असतील तो सगळ्‌यात कूल मानला जायचा. ह्या फ्रेंडशिप डे ला मी माझ्या मित्रमैत्रिणींना भेटेने आणि मग आम्ही जेवायला बाहेर जाऊ.”


पिया अलबेलामधील नरेन ऊर्फ अक्षय म्हात्रे म्हणाला, “जेव्हाही कधी मी फ्रेंडशिप डे चा विचार करतो तेव्हा मला माझ्या शाळेतील आणि कॉलेजमधील दिवस आठवतात, जेव्हा लेक्चरला दांडी मारायचो. मला वाटतं कुछ कुछ होता है ह्या चित्रपटाने फ्रेंडशिप डे चा ट्रेंड आणला. शाहरूखचा डायलॉग‘प्यार दोस्ती है’ आजही माझ्या मनात आहे. ह्यावर्षी मी फ्रेंडशिप डे सेटवर माझ्या सहकलाकारांसोबत साजरा करेन आणि मग रात्रीच्या जेवणाच्या वेळेस माझ्या जुन्या दोस्तांना भेटेन. माझे सगळ्‌यात खास दोस्त सेटवरच आहेत. आमचा लेखक राहुल, माझा दुष्ट ऑनस्क्रीन भाऊ अंकित व्यास आणि माझी
ऑनस्क्रीन पत्नी शीन दास यांच्यासोबत हा खास दिवस मला साजरा करायचा आहे.”
 

Web Title: Friendship Day 2018: artist remember their good memories about friendship days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.