पाच वर्षांच्या आयेशाचा ‘जीजी माँ’मध्ये प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 12:14 PM2018-07-31T12:14:15+5:302018-07-31T12:14:49+5:30

इतक्या लहान वयातच आयेशाने बरीच कमाई केली आहे.सेटवर आयेशा ही एक सगळ्यांची आवडती बनली आहे.आपल्या प्रसंगाचे चित्रीकरण एकाच शॉटमध्ये पूर्ण करते. ती लहानपणीच स्टार बनली आहे, असे या मालिकेचे निर्माते म्हणतात.

Five-year-old Ayesha's 'Jiji Maa' admission | पाच वर्षांच्या आयेशाचा ‘जीजी माँ’मध्ये प्रवेश

पाच वर्षांच्या आयेशाचा ‘जीजी माँ’मध्ये प्रवेश

googlenewsNext

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात... असाच काहीसा आयेशाच्या बाबतीत म्हणतात येईल. केवळ पाच वर्षांच्या आयेशा विंधाराने इतक्या लहान वयातच आपल्या अप्रतिम अभिनयाने रसिकांची मनं जिंकायला सुरूवात केली आहे. ती आता  छोट्या पडद्यावर ‘जीजी माँ’ या मालिकेत एंट्री करणार आहे.या मालिकेत तिचे नाव ‘चिकू’ असे असून ती रावत हाऊसमध्ये त्या घरातील एक मुलगी असल्याचा दावा करून प्रवेश मिळवील. हातात एक पत्र घेतलेल्या चिकूला रावत हाऊसबाहेर उभे केले जाते. ती रावत यांच्या कुटुंबातीलच एक मुलगी असून त्यामुळे या कुटुंबाला तिचा स्वीकार करून तिचे पालनपोषण करावे लागेल, असे या पत्रात लिहिलेले असते.

आयेशा अखेरची ‘उडान’ या मालिकेत रक्षाची भूमिका साकारली होती.तसेच त्यापूर्वी तिने ‘मिटेगी लक्ष्मणरेखा’मध्ये मिष्टीची, तर ‘सिध्दीविनायक’मध्ये जूहीची भूमिकाही रंगविली होती. या मालिकांबरोबरच आता ती ‘जीजी माँ’च्या चित्रीकरणाचे वेळापत्रकही सांभाळणार आहे.केवळ टीव्ही मालिकाच नव्हे,तर तब्बल 50 जाहिरातींमध्ये तिचे छायाचित्र प्रसिध्द होणार असून यात रिलायन्स म्युच्युअल फंड,एसबीआय इन्शुरन्स आणि फॉर्च्युन व्हिवो कुकिंग ऑईल यासारख्या जाहिरातींचा समावेश आहे. इतक्या लहान वयातच आयेशाने बरीच कमाई केली आहे.सेटवर आयेशा ही एक सगळ्यांची आवडती बनली आहे.आपल्या प्रसंगाचे चित्रीकरण एकाच शॉटमध्ये पूर्ण करते. ती लहानपणीच स्टार बनली आहे, असे या मालिकेचे निर्माते म्हणतात.

अभिनय करणे प्रत्येक कलाकारसाठी आव्हानात्मक असेत.शेवटी आपल्या आपल्या अभिनयातून रसिकांचे मनोरंजन होणे हेच महत्त्वाचे असते.प्रत्येक कलाकार आपापल्या अभिनयकौशल्याने रसिकांची मनं जिंकण्याचे प्रत्येकवेळी प्रयत्न करत असतो.त्यातही अनेक प्रकारच्या अभिनयगुणांनी परिपूर्ण असलेल्या या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवणे हे तर अधिकच अवघड आहे.म्हणूनच ‘जीजी माँ’ मालिकेत उत्तरादेवीची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री पल्लवी प्रधान हिचा रंगमंचावर काम केल्यानंतर  टीव्ही मालिकांकडे वळल्या.एकांकिका आणि नाटकांतून आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीस प्रारंभ केलेल्या पल्लवी प्रधानला पहिल्या मानधनापोटी केवळ 75 रुपयांचा धनादेश मिळाला होता. तीन तासांच्या चित्रपटासाठी शेकडो रुपये मोजावे लागण्याच्या काळात केवळ 75 रुपयांवरून प्रारंभ करून रंगमंचाकडून रुपेरी पडद्याच्या दिशेने केलेला व्यावसायिक प्रवास आणि यादरम्यान कमावलेले नाव ही तिची मोठीच कमाई म्हणावी लागेल.पल्लवी प्रधान ही एक उत्तम अभिनेत्री असून तिनं फक्त मराठी रंगमंचच नाहीतर गुजराती रंगमंचही गाजवला. 

Web Title: Five-year-old Ayesha's 'Jiji Maa' admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.