बिग बॉस मराठी २ : सुरेखा पुणेकरांनी खडसावले अभिजीत बिचुकलेंना, म्हणाल्या थोबाड फोडेन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 03:50 PM2019-06-03T15:50:46+5:302019-06-03T15:51:15+5:30

बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये शनिवारी व रविवारी प्रेक्षकांना विकेंडचा डाव पहायला मिळाला. ज्यामध्ये महेश मांजरेकर यांनी सदस्यांना ते कुठे चुकले, कुठे बरोबर होते, कोण स्टार परफॉर्मर होते तर कुणाला सुधारायची गरज हे सांगितले.

Bigg Boss Marathi 2: Surekha Punekar irritated with Abhijeet Bichukle | बिग बॉस मराठी २ : सुरेखा पुणेकरांनी खडसावले अभिजीत बिचुकलेंना, म्हणाल्या थोबाड फोडेन

बिग बॉस मराठी २ : सुरेखा पुणेकरांनी खडसावले अभिजीत बिचुकलेंना, म्हणाल्या थोबाड फोडेन

googlenewsNext

बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये शनिवारी व रविवारी प्रेक्षकांना विकेंडचा डाव पहायला मिळाला. ज्यामध्ये महेश मांजरेकर यांनी सदस्यांना ते कुठे चुकले, कुठे बरोबर होते, कोण स्टार परफॉर्मर होते तर कुणाला सुधारायची गरज हे सांगितले. याचबरोबर बिग बॉस मराठी सीझन २ चा घराचा पहिला कॅप्टन होण्याचा मान शिव ठाकरे याला मिळाला. आता शिव घरच्या सदस्यांना कसं साभांळून घेणार, घरचे सदस्य त्याचं किती ऐकणार हे या आठवड्यामध्ये कळेलच. पहिल्या आठवड्यामध्ये कुणीच घरी जाणार नाही हे सांगून महेश मांजरेकर यांनी घरच्यांना सरप्राईझ दिले. 

या आठवड्याची पहिल्या दिवसाची सुरुवात कसे काय पाटील बर आहे ना ? या गाण्याने झाली.  आज अभिजित बिचुकले यांना बिग बॉस यांनी अवघड एक टास्क दिला आणि तो म्हणजे त्यांच्या टीम मधील कुणी एका सदस्याला वैशालीच्या टीममध्ये पाठवणे आणि यावरूनच सुरेखा पुणेकर यांनी बिचुकले यांना खडसावत थोबाड फोडेन असंे म्हणाल्या.


याचबरोबर आज घरामध्ये रंगणार नवा टास्क पोपटाचा पिंजरा... ज्यामध्ये बिग बॉस सदस्यांना त्यांना नको असलेल्या सदस्यांना नॉमिनेट करण्याची संधी देणार आहेत आणि ही संधी एका पक्षात दडलेली आहे. प्रत्येक टीमकडे विरूद्ध टीमच्या सदस्यांचे पक्षी असणार आहेत.

प्रत्येक बझरनंतर सदस्यांना विरुध्द टीमच्या सदस्याचा पक्षी पिंजऱ्यात बंधिस्त करायचा आहे म्हणजेच विरुद्ध टीमच्या सदस्याला नॉमिनेट करायचे आहे. यावरून नेहा आणि शिवमध्ये वाद झालेला बघायला मिळणार आहे.  आता कोण बरोबर नेहा कि शिव हे आजच्या भागामध्ये कळेलच.

Web Title: Bigg Boss Marathi 2: Surekha Punekar irritated with Abhijeet Bichukle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.