बिग बॉस मराठी २ मधील अभिजीत बिचुकलेला न्यायालयीन कोठडी, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 02:37 PM2019-06-22T14:37:46+5:302019-06-22T15:13:52+5:30

अभिजीत बिचुकलेच्या जामीन अर्जावर नुकतीच सुनावणी झाली आहे.

Bigg boss Marathi 2 fame abhijit bichkule sent to judicial custody | बिग बॉस मराठी २ मधील अभिजीत बिचुकलेला न्यायालयीन कोठडी, वाचा सविस्तर

बिग बॉस मराठी २ मधील अभिजीत बिचुकलेला न्यायालयीन कोठडी, वाचा सविस्तर

googlenewsNext
ठळक मुद्देअभिजीत बिचुकलेच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली असून चेक बाऊन्सप्रकरणी त्याला दिलासा मिळाला आहे. पण त्याचसोबत त्याच्यावर खंडणीप्रकरणी देखील खटला या कोर्टात सुरू होता. या खटल्यात त्याला न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो बिग बॉसच्या सीझन २ मधील सर्वाधिक चर्चेत असलेला स्पर्धेक अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरातून काल बाहेर पडला. त्याला सातारा पोलिसांनी आरे पोलिसांच्या मदतीने काल अटक केली.

आरे पोलिसांच्या मदतीने सातारा पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अभिजित बिचुकलेला गोरेगाव फिल्मसिटी येथील बिग बॉसच्या सेटवरून काल अटक केली होती. साताऱ्यात त्याच्याविरोधात भा. दं. वि. कलम १३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ३५ हजारांचा चेक बाउन्स झाल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली. 

बिचुकलेला काल अटक झाल्यानंतर त्याचा रक्दाब वाढल्यामुळे सातारा येथील सातारा जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्याला दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला आणि त्यानंतर कोर्टापुढे त्याला उभे करण्यात आले. त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली असून चेक बाऊन्सप्रकरणी त्याला दिलासा मिळाला आहे. पण त्याचसोबत त्याच्यावर खंडणीप्रकरणी देखील खटला या कोर्टात सुरू होता. या  खटल्यात त्याला न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

रुग्णालयात असताना अभिजीत बिचुकलेने एबीपी माझाशी संवाद साधला होता. त्यावेळी तो म्हणाला होता की, मी गेल्या १२ वर्षांपासून वकील संदीप संकपाळ यांचा भाडेकरू आहे. त्यांनी माझ्याकडून भाड्याचे पैसे घेतले होते. पण आता ते ही गोष्ट मान्य करत नाहीयेत. त्यांनी २०१५ मधील एक जुनी केस उकरून काढली असून कोर्टाची दिशाभूल करून माझ्याविरोधात अटक वॉरंट काढलं आहे. यात नक्कीच राजकीय हस्तक्षेप असून राजकीय स्वार्थासाठी माझा उपयोग केला जात आहे. माझ्याविरोधात त्यांना भडकवले गेले असून याचा सोक्षमोक्ष लवकरच लागले.

Web Title: Bigg boss Marathi 2 fame abhijit bichkule sent to judicial custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.