‘बिग बॉस’ पेक्षाही ‘मोठ्या’ घरात कैद झालोय -सलमान खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 05:34 PM2018-09-08T17:34:46+5:302018-09-08T17:35:59+5:30

‘बिग बॉस’च्या या १२ व्या सीजनमध्ये विचित्र जोड्या बघावयास मिळणार आहेत. या शोच्या घरात कैद स्पधर्कांची खेचातानी करणारा सलमानचे म्हणणे आहे की, तो तर ‘बिग बॉस’पेक्षाही मोठ्या घरात कैद होवून आला आहे.

'Bigg Boss' has been imprisoned in 'Big' house - Salman Khan | ‘बिग बॉस’ पेक्षाही ‘मोठ्या’ घरात कैद झालोय -सलमान खान

‘बिग बॉस’ पेक्षाही ‘मोठ्या’ घरात कैद झालोय -सलमान खान

googlenewsNext

श्वेता पांडेय
पुन्हा एकदा सलमान खान चर्चित रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’सोबत हजर आहे. ‘बिग बॉस’च्या या १२ व्या सीजनमध्ये विचित्र जोड्या बघावयास मिळणार आहेत. या शोच्या घरात कैद स्पधर्कांची खेचातानी करणारा सलमानचे म्हणणे आहे की, तो तर ‘बिग बॉस’पेक्षाही मोठ्या घरात कैद होवून आला आहे. त्याचे म्हणणे आपण समजून घेतले असेलच. या रिअ‍ॅलिटी शोच्या लॉँचिंगप्रसंगी सलमान खानशी बिग बॉसपासून ते त्याच्या चित्रपटांबाबत विशेष चर्चा झाली. जाणून घेऊया त्या चर्चेविषयी... 

* आपण पुन्हा एकदा या शोमध्ये सहभागी झालातच. अशा कोणत्या कारणाने या शोबाबत एवढी जवळीकता आहे?
-  प्रत्येकवर्षी स्पर्धक बदलत राहतात, याच कारणाने या शोबाबत जवळीकता साधली गेली आहे. जर दरवर्षी तेच स्पर्धक असतील तर मी बोअर होतो. 

* हा शो आणि स्पर्धक निवडीबाबत तुमचा किती हस्तक्षेप असतो?
 - अजिबात नाही. मला तर स्टेजवर समजते की, शोमध्ये कोण-कोण आहेत. उदाहरणदाखल बोलायचे झाले तर पुनित इस्सर यांनादेखील ‘बिग बॉस’मध्ये पार्टिसिपेट करण्यावरुन मला काहीच माहित नव्हते. पुनित यांना मी तेव्हापासून ओळखतो जेव्हा मी फक्त १५ वर्षाचा होतो. जेव्हा मी त्यांना बिग बॉसच्या स्टेजवर पाहिले तर अगोदर मला वाटले की, ते पाहुणे म्हणून आले असतील, ज्यांचे काही परफॉर्मेंस असेल. मात्र माझा हा समज तेव्हा खोटा ठरला जेव्हा मला कळले की, पुनित या शोमध्ये सहभागी होण्यासाठी आले आहेत. हे समजल्यावर मी मनातच विचार केला की, जर त्यांनी काही गडबड केली तर त्यांनाही रागावे लागेल. 

* ती गोष्ट जी आपण ‘बिग बॉस’च्या फॉर्मेटमध्ये बदलू इच्छिता?
- हो, एक गोष्ट आहे. मला वाटते की, पहिल्या आठवड्याचे एविक्शन होऊ नये, कारण बिचारे स्पर्धक या शोमध्ये येऊन काही समजण्याअगोदरच त्यांना एविक्ट केले जाते. मला असे वाटते की, पहिले एविक्शन दुसऱ्या आठवड्यापासून सुरु व्हायला हवे. 

 * जर आपणास ‘बिग बॉस’सारख्या घरात दोन किंवा तीन दिवसांसाठी बंद केले गेले, तर आपले कोणकोणते रुप प्रेक्षकांसमोर येईल?
- मी ‘बिग बॉस’पेक्षाही खूप मोठ्या घरात कैद झालो आहे. आता आपणास असा कोणता पैलू दाखविणे बाकी राहिले. (जोरात हसू लागतो)

* असे काही, जे आपणास ‘बिग बॉस’ने शिकवले आहे?
- बरेच काही. या खेळास मी मानसिकसोबतच शारीरिक संदर्भात खूपच आवाहनात्मक मानतो. बऱ्याचदा स्पर्धकांची वागणुक बघून असे वाटते की, याने या परिस्थितीत अशा प्रकारचा व्यवहार करुन किती चांगले केले. तर कधी असे वाटते की, याने अशा प्रकारचा व्यवहार करायला नको होता. बऱ्याचदा त्या परिस्थितीत मी स्वत:ला पाहतो.  

* स्पर्धकांना अशा परिस्थितीत पाहून कधी आपणास दया आली?
 - पहिल्या तीन-चार सीजनमध्ये बिचाऱ्या  स्पर्धकांना खेळच माहित नसायचा, मात्र आता गेल्या तीन-चार सीजनमध्ये लोक पाहून येतात, तर हा खेळ चांगल्याप्रकारे समजून घेतात. आता सर्वांना खेळ माहित झालाय, मात्र खेळ समजून येण्याचा दावा करणाऱ्यांचीही फसवणूक होते. त्यांची कोणतीही चालाखी कामात येत नाही. तसे त्यांच्यावर कोणताही अत्याचार केला जात नाही, पण हा खेळ आपणास सर्वाइव्ह करण्याची पद्धती शिकवतो. बऱ्याचदा तर विनाकारण तक्रारी केल्या जातात की, जेवण नाही. मात्र सर्व घरात फळ, भाजीपाला असतो. त्यानंतरही सांगितले जाते की, जेवन नाहीय. घरात फे्रे शफ्रूट्स असल्याने ते सेवन करुन आपण जगू शकतात.   

* आपणाकडेही ‘बिग बॉस’मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी शिफारशी येतात?
 - हो येतात, मात्र मी त्यांना स्पष्ट नकार देतो की, माझा काही संबंध नाहीय. मी कोणाची शिफारस करावी आणि कोणाची नोकरी जावी. हो, मात्र जर कोणाची कास्टिंग झालेली नसेल तर मी हे नक्की सांगतो की, ही व्यक्ती या भूमिकेसाठी फिट आहे.  मी कुणाला संधी देऊ इच्छितो, तर त्यासाठी स्वत:च चित्रपट बनवितो. उदाहरणार्थ ‘जय हो’ मध्ये डेजी शाह, जी नंतर ‘रेस 3’ मध्येही दिसली. अथिया, सूरज, एली, स्रेहा यांच्यात मला सामर्थ्यता दिसली आणि मी त्यांच्यासोबत काम केले, मात्र भूमिकेच्या मागणीनुसारच त्यांची निवड झाली.    

* अशा बातम्या होत्या की, ‘रेस 3’ साठी आपण जॅकलिन आणि डेजीला रिकमंड केले होते?
- अजिबात नाही. असे घडले होते की ‘रेस 3’ची कास्टिंग झाली होती, ज्यात डेजी शाह आणि जॅकलिन अगोदरपासूनच सिलेक्ट झाले होते. रेमो डिसूजा अगोदर एक डान्स बेस्ड चित्रपट बनवू इच्छित होते, त्यानंतर ‘रेस 3’ सुरु होणार होता. आता या डान्स चित्रपटात अडचणी होत्या, माझे डान्सिंग स्किल्स, ज्यांना तपासायला वेळ लागणार होता. अशातच डान्सिंग चित्रपटास पुढे ढकलून ‘रेस 3’ अगोदर सुरु केला.  

* रेमो डिसूजासोबतच्या डान्सिंग चित्रपटाची सध्या काय स्थिती आहे?
- त्या चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण झाली आहे. विश्वास ठेवा जबरदस्त तयारी आहे. मी देखील डान्सिंग शिकत आहे. पाइपलाइनच्या चित्रपटांना पूर्ण केल्यानंतर त्याची शूटिंग करेल.  

* ‘बिग बॉस’च्या दरम्यान कधी आपला तोल गेला आहे?
 - मी आणि नाराज. तसा मी नाराज खूपच कमी होतो, मात्र बऱ्याचदा एखादी गोष्ट मर्यादेपलिकडे जाते तेव्हा वाटते की, घरात जाऊन मारावे आणि नंतर बाहेर निघावे.   

* पडद्यावर दमदार हीरो तर अनेकदा बनले आहेत, मात्र कधी व्हिलनच्या भूमिकेत दिसाल? 
 माझी कधीही व्हिलन बनण्याची इच्छा नाहीय, कारण माझे चाहते मला व्हिलन्सच्या रुपात पसंत करणार नाहीत. माझ्या चित्रपटात मोठमोठे संदेश असतात. माझ्या चाहत्यांचीही इच्छा नाहीय की मी पडद्यावर वाईट व्यक्ती बनावे.  

* पहिली गर्लफ्रेंड जिच्यासोबत आपण गोव्यात आले?
- संगीता बिजलानी. गे्रवियराच्या शूटिंगदरम्यान मी संगीतासोबत गोव्यात आलो होतो.   

Web Title: 'Bigg Boss' has been imprisoned in 'Big' house - Salman Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.