Bigg Boss12 :हिना खाननंतर टीव्हीच्या या 'बहू'ला मिळाले सगळ्यात जास्त मानधन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 01:15 PM2018-09-06T13:15:24+5:302018-09-06T13:22:08+5:30

'बिग बॉस 12' सिझनसाठी 'ससुराल सिमर का फेम' दीपिकाला हिना खानपेक्षा दुप्पट मानधन देण्यात आल्याची बाब समोर आली आहे.

Bigg Boss 12: Dipika Kakar aka simar offered double the fees of Hina Khan | Bigg Boss12 :हिना खाननंतर टीव्हीच्या या 'बहू'ला मिळाले सगळ्यात जास्त मानधन !

Bigg Boss12 :हिना खाननंतर टीव्हीच्या या 'बहू'ला मिळाले सगळ्यात जास्त मानधन !

googlenewsNext

सेलिब्रिटी मंडळींवर रसिक जीव ओवाळून टाकतात. रसिकांचं या सेलिब्रिटींवर मनापासून प्रेम असतं. रसिकांच्या या प्रेमामुळेच सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या करिअरमध्ये कोट्यवधींची कमाई करतात. करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना होणा-या कमाईचा आकडा पाहून अनेकांना धक्काही बसतो. आता 'बिग बॉसचा 12' वा सिझन रसिकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये सेलिब्रेटींच्या नावाचीही घोषणा करण्याता आली.मात्र आता या स्पर्धकांना मिळणारे मानधनही चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या सिझनमध्ये 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील अक्षरा बहु फेम हिना खानला सगळ्यात जास्त मानधन देण्यात आले होते. आठवड्यासाठी 7 ते 8 लाख रुपये इतके मानधन हिनाला देण्यात आले होते. तर हितेन तेजवानीला 7 ते 7.5 लाख रुपये मानधन देण्यात आले होते. सगळ्यात जास्त महागडी कंटेस्टंट म्हणून हिना खान टॉप लिस्टवर होती. 

अगदी त्याचप्रमाणे यंदाही 'बिग बॉस 12' व्या सिझनसाठी टीव्हीच्या बहुचाच बोलबाला असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण 'ससुराल सिमर का' मालिकेतून घराघरात पोहचलेली सिमर म्हणजे दीपिका कक्कड 'बिग बॉस 12' सिझनमध्ये स्पर्धक म्हणून एंट्री घेणार आहे. विशेष म्हणजे दीपिकाला हिना खानपेक्षा दुप्पट मानधन देण्यात आल्याची बाब समोर आली आहे. दीपिकाला 14 ते 16 लाख इतके मानधन देण्यात आले असल्याचे कळतंय.

'बिग बॉस' या शोचे आजवरचे सगळेच सिझन हिट ठरले आहेत. या कार्यक्रमाच्या गेल्या सिझनची विजेती शिल्पा शिंदे ठरली होती. यंदाच्या सिझनमध्ये स्पर्धक एकटे नसून जोड्यांमध्ये येणार आहेत. ही जोडी पती-पत्नी, मुलगा-मुलगी कोणाचीही असू शकते. 'बिग बॉस १२' आता जोडीची संकल्पनाच बदलण्यासाठी सज्ज झाला आहे. कारण त्यांची थीमच आहे विचित्र जोड्या. सासू-सून, मामा-भाचा, मालक-नोकर अशा विविध जोड्या या शोद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. 

Web Title: Bigg Boss 12: Dipika Kakar aka simar offered double the fees of Hina Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.