'मंगलम दंगलम' मालिकेत अर्जुन व संजीव अडकतात लिफ्टमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 06:30 AM2018-12-21T06:30:00+5:302018-12-21T06:30:00+5:30

‘मंगलम दंगलम’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.

Arjuna and Sanjeev stuck in a lift in 'Mangalam Dangalam' serial | 'मंगलम दंगलम' मालिकेत अर्जुन व संजीव अडकतात लिफ्टमध्ये

'मंगलम दंगलम' मालिकेत अर्जुन व संजीव अडकतात लिफ्टमध्ये

googlenewsNext

सोनी सब वाहिनीवर नुकतीच सुरू झालेल्या ‘मंगलम दंगलम’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. अर्जुन (करणवीर शर्मा) आपल्या होणाऱ्या सासऱ्यांना त्यांच्या लाडक्या मुलीसाठी आपणच सर्वोत्तम आहोत हे पटवण्याचा प्रयत्न करत आहे. आगामी कथानकानुसार, नशिबाच्या अजब फेऱ्यामुळे संजीव (मनोज जोशी) आणि अर्जुन दोघे एका लिफ्टमध्ये अडकतात.

संजीवला कोर्टातील केस जिंकण्यामध्ये अर्जुन मदत करतो. त्यामुळे त्याचे कौतुक करण्यासाठी म्हणून अर्जुनला काहीतरी बक्षीस देण्याचे संजीव ठरवतो. पण अखेरच्या क्षणी, संजीव अर्जुनला मिठी मारणार तोच, खुराना अर्जुनबद्दलचे एक लपवलेले सत्य समोर आणतो; त्यामुळे संजीव अर्जुनचा पूर्वीपेक्षाही अधिक तिरस्कार करू लागतो. संजीवचे मन वळवण्याच्या प्रयत्नात स्पष्टीकरण देण्यासाठी अर्जुन त्याच्या पाठोपाठ लिफ्टमध्ये शिरतो आणि ते दोघे अपघाताने लिफ्टमध्ये अडकतात.
संजीवला क्लॅस्टरोफोबिया असल्याने ही परिस्थिती हाताळणे अर्जुनसाठी कठीण होऊन बसते. मात्र, या दोघांना लिफ्टमधून सुरक्षितपणे बाहेर काढले जाते तेव्हा बाहेर वाट बघत उभे असलेले कुटुंबीय सुटकेचा नि:श्वास टाकतात. बाहेर उभ्या असलेल्या घरातल्या लोकांना नेमके काय बघायला मिळते?
अर्जुनची भूमिका साकारणारा करणवीर शर्मा म्हणाला, “मनोज जोशींसारख्या प्रतिभावंत कलाकारासोबत काम करणे खरोखर सन्मानाची बाब आहे. एक कलाकार म्हणून त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. अर्जुन आणि संजीव एका छोट्या लिफ्टमध्ये अडकले असताना त्यांच्यापुढील समस्या कशी सोडवतात हे बघताना प्रेक्षकांना नक्कीच मजा येईल.”

Web Title: Arjuna and Sanjeev stuck in a lift in 'Mangalam Dangalam' serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.