कॅटचे असेही सोंग

By Admin | Published: September 3, 2016 02:28 AM2016-09-03T02:28:35+5:302016-09-03T02:28:35+5:30

दीपिका पादुकोन सध्या बॉलिवूडची ‘हायेस्ट पेड’, अर्थात सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. प्रियांका चोप्रा आणि कॅटरिना कैफ या दोघींना पछाडून दीपिकाने हा पल्ला

Such a song of cats | कॅटचे असेही सोंग

कॅटचे असेही सोंग

googlenewsNext

दीपिका पादुकोन सध्या बॉलिवूडची ‘हायेस्ट पेड’, अर्थात सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. प्रियांका चोप्रा आणि कॅटरिना कैफ या दोघींना पछाडून दीपिकाने हा पल्ला गाठला. खरे तर बॉलिवूडमध्ये सर्वत्र हीच चर्चा आहे; पण कॅटरिनाला मात्र त्याची खबरही नाही. अर्थात, हे आम्ही नाही, तर खुद्द कॅटनेच बोलून दाखवलेय. होय, दीपिका बॉलिवूडची सध्याची ‘हायेस्ट पेड’ अभिनेत्री आहे, तुला याबद्दल काय वाटते? असा प्रश्न कॅटला अलीकडे विचारण्यात आला. मात्र, कॅटने काहीच माहीत नसल्याच्या थाटात, ‘ओह्, रिअली? मला हे अजिबात ठाऊक नव्हते’, असे उत्तर दिले. आता आपल्या अवतीभवती काय सुरू आहे, हे कॅटला माहीत नसणे, म्हणजे जरा अतीच झाले. पण, काय करणार? बॉलिवूडमध्ये असे ‘सोंग’ घेणारे पदोपदी भेटतात...

Web Title: Such a song of cats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.