स्ट्रगलर्सचे नवीन वर्षात सरप्राईज!

By Admin | Published: January 2, 2017 03:07 AM2017-01-02T03:07:00+5:302017-01-02T03:07:00+5:30

आपल्या विनोदी अभिनयशैलीमुळे प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता कुशल बद्रिके ‘स्ट्रगलर साला’ या वेबसिरीजमध्ये संतोष जुवेकरसोबत दिसत आहे.

Struggles to Surprise in New Year! | स्ट्रगलर्सचे नवीन वर्षात सरप्राईज!

स्ट्रगलर्सचे नवीन वर्षात सरप्राईज!

googlenewsNext

आपल्या विनोदी अभिनयशैलीमुळे प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता कुशल बद्रिके ‘स्ट्रगलर साला’ या वेबसिरीजमध्ये संतोष जुवेकरसोबत दिसत आहे. ही वेबसीरिज काही दिवस बंद होती, परंतु नेटिझन्सच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा या वेबसीरिजचे एपिसोड करण्यात आले. लवकरच ही वेबसीरिज सुरू हाणार असल्याचे आम्ही तुम्हाला सांगितलेच होतेच. त्यामुळे आता प्रेक्षकांसाठी एक खूशखबर आहे. नवीन वर्षामध्ये हे स्ट्रगलर्स पुन्हा एकदा काम मागण्यासाठी सज्ज होणार आहेत. कुशल बद्रिके सध्या स्ट्रगलर्सचे डबिंग करीत असल्याचे समजतेय. कुशल सांगतो, नवीन वर्षात आम्ही येतोय... पुढील वर्षात थंडी पण येतेय आणि आम्ही पण येतोय... जानेवारीत स्ट्रगलर्सचा एपिसोड दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे आता हे स्ट्रगलर्स कोणत्या दिग्दर्शकांकडे आपले नशीब आजमाविण्यासाठी जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्या वेबसीरिजचा जमाना आहे. बऱ्याच वेबसीरिजमध्ये लोकप्रीय कलाकार काम करताना दिसत आहेत. मालिका, चित्रपट, नाटक या सर्व गोष्टी सांभाळत कलाकार वेबसीरिजसाठीही खास वेळ देतांना दिसताहेत. नेटिझन्सना तर हा हा एक चांगलाच करमणुकीचा विषय झालाय. आता नव्या वेबसीरिजमध्ये नेटिझन्सना खिळवून ठेवण्यासाठी कुशल आणि संतोष काय नवीन करणार, हे आपल्याला जानेवारीलाच कळणार. तेव्हा या स्ट्रगलर्सच्या नवीन वर्षातील भन्नाट सरप्राईजसाठी सर्वजण तयार असा!!

Web Title: Struggles to Surprise in New Year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.