अध्ययनने वाचवले साराचे प्राण

By Admin | Published: July 25, 2014 12:29 AM2014-07-25T00:29:38+5:302014-07-25T00:29:38+5:30

सारा लॉरेन यांच्यावर एक सीन शूट केला जात असताना घडलेला अपघात साराच्या जिवावर बेतू शकत होता; पण अध्ययनच्या समयसूचकतेमुळे तिचा जीव वाचवला.

Sara's life saved by study | अध्ययनने वाचवले साराचे प्राण

अध्ययनने वाचवले साराचे प्राण

googlenewsNext
‘इश्क क्लिक’ या चित्रपटाच्या सेटवर अध्ययन सुमन आणि सारा लॉरेन यांच्यावर एक सीन शूट केला जात असताना घडलेला अपघात साराच्या जिवावर बेतू शकत होता; पण अध्ययनच्या समयसूचकतेमुळे तिचा जीव वाचवला. एका सीनमध्ये सारा आणि अध्ययनच्या आजूबाजूला काचेच्या बाटल्या फोडल्या जाणार होत्या; पण त्याचवेळी काचेचे झुंबर कोसळले. अध्ययनने समयसूचकता दाखवत साराला झुंबराखालून ओढले. घाबरलेल्या साराला थोडावेळ काही सुचलेच नाही. पुढे घडलेला प्रसंग समजल्याने तिने अध्ययनचे आभार मानले. अपघातामुळे सेटवरील कोणालाही इजा झाली नाही, त्यामुळे निर्मात्यांना दिलासा मिळाला. त्यांनीही रिअल लाईफ हीरो असलेल्या अध्ययनचे आभार मानले.

 

Web Title: Sara's life saved by study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.