नटसम्राट नाना आणि थलायवा रजनीकांत एकाच चित्रपटात

By Admin | Published: June 9, 2017 11:20 AM2017-06-09T11:20:49+5:302017-06-09T11:41:31+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील नटसम्राट नाना पाटेकर आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलायवा रजनीकांत यांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार आहे

In the same film, in the same film, Natsmahrat Nana and Thalayava Rajinikanth | नटसम्राट नाना आणि थलायवा रजनीकांत एकाच चित्रपटात

नटसम्राट नाना आणि थलायवा रजनीकांत एकाच चित्रपटात

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - मराठी चित्रपटसृष्टीतील नटसम्राट नाना पाटेकर आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलायवा रजनीकांत यांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार आहे. रजनीकांत यांचा आगामी चित्रपट  "काला करिकालन"मध्ये नाना पाटेकर महत्वाची भूमिका निभावणार आहे. नाना पाटेकर चित्रपटात व्हिलनची भूमिका निभावतान दिसतील तर रजनीकांत त्यांच्याशी टक्कर घेत दोन हात करताना दिसेल. नाना पाटेकर आणि रजनीकांत यांना एकत्र पडद्यावर पहायला मिळणार असल्याने चाहते मात्र प्रचंड खुशीत आहेत.
 
("काला करिकालन"चे पोस्टर रिलीज, रजनीकांत पुन्हा डॉनच्या भूमिकेत)
(रजनीकांत यांच्यासह झळकणार अंजली!)
 
काही आठवड्यांपुर्वीच नाना पाटेकर यांचं कास्टिंग करण्यात आलं आहे. या चित्रपटात नाना एका दुष्ट राजकारण्याची भूमिका साकारताना दिसतील. तर रजनीकांत त्यांचा कट्टर विरोधक असणार आहे. दोघांमधील ही जुगलबंदी पाहणं प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. 
 
नुकतंच रजनीकांत यांनी मुंबईतील दोन आठवड्यांचं शुटिंग शेड्यूल पुर्ण केलं. 27 मे रोजी रजनीकांत शुटिंगसाठी मुंबईत आले होते. रजनीकांत पुन्हा एकदा शुटिंगसाठी मुंबईत येण्याची शक्यता आहे. मुंबईनंतर चेन्नईत पुढील शुटिंग पार पडेल. रजनीकांत गेले दोन आठवडे विश्रांती न घेता शुटिंग पुर्ण करत आहेत. 
 
या चित्रपटात रजनीकांत मुंबईतल्या तमिळ लोकांच्या नेता दाखवण्यात येणार असून त्यांच्या हक्काची लढाई लढतोय. "कबाली"चे दिग्दर्शक पा. रंजीत या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर रजनीकांत यांचा जावई धनुष याने चित्रपटाची निर्मिती केली आहे.
 
चित्रपटात हुमा कुरेशी,अंजली पाटील आणि पंकज त्रिपाठी यांच्याही मुख्य भूमिका असणार आहेत. पंकज त्रिपाठी चित्रपटात पोलीस अधिका-याची भूमिका निभावणार आहे.
 

Web Title: In the same film, in the same film, Natsmahrat Nana and Thalayava Rajinikanth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.