क्रांती चालवणार ट्रक

By Admin | Published: January 28, 2016 02:48 AM2016-01-28T02:48:31+5:302016-01-28T02:48:31+5:30

एरवी बॉलीवूड, हॉलीवूडमध्ये बिनधास्त म्हणण्यापेक्षा सुसाट गाड्या चालवणाऱ्या हीरोइन्स अनेक पाहिल्या असतील; पण हा टे्रंड आता मराठीतही येत आहे. स्टंट्स करणाऱ्या, सुसाट

Revolution truck | क्रांती चालवणार ट्रक

क्रांती चालवणार ट्रक

googlenewsNext

एरवी बॉलीवूड, हॉलीवूडमध्ये बिनधास्त म्हणण्यापेक्षा सुसाट गाड्या चालवणाऱ्या हीरोइन्स अनेक पाहिल्या असतील; पण हा टे्रंड आता मराठीतही येत आहे. स्टंट्स करणाऱ्या, सुसाट गाड्या पळवणाऱ्या, मारामारी करण्याचा टे्रंड मराठीत येऊ लागला आहे. आता अजून एका चित्रपटात म्हणजेच ‘किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी’मध्ये आपल्याला हे अनुभवायची संधी मिळेल. अभिनेत्री क्रांती रेडकर चक्क एक ट्रक चालवताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तेही तिला कोणतेही जड वाहन चालवायची सवय नसताना. यासाठी चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यापूर्वी तिने त्याचे व्यवस्थित टे्रनिंग घेतल्याचेही समजते. इतकेच नाही, तर एका सापासमोरही ती नृत्य करताना दिसणार आहे. अर्थातच, या शॉटसाठी ती खूप घाबरली; पण सहअभिनेता सुबोध भावे यांनी ती ते करू शकेल, असा विश्वास दिला आणि तिनेही ते नृत्य पूर्णत्वास नेले. त्यामुळे या चित्रपटामधून अभिनयाव्यतिरिक्त क्रांतीला खूप काही शिकायला मिळालं, असंच म्हणावं लागेल.

Web Title: Revolution truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.