लग्नकथेतल्या तरु णाईचे प्रतिबिंब

By Admin | Published: June 17, 2017 01:58 AM2017-06-17T01:58:17+5:302017-06-17T01:58:17+5:30

लग्नाची गोष्ट हा विषय चित्रपटसृष्टीला नवीन नाही. हिंदी पडद्यावरच्या लग्नाच्या या गोष्टी अलीकडे मराठीतही सर्रास दिसून येतात. ‘तुझं तू माझं मी’ अर्थात टीटीएमएम

Reflection of the young man in the wedding | लग्नकथेतल्या तरु णाईचे प्रतिबिंब

लग्नकथेतल्या तरु णाईचे प्रतिबिंब

googlenewsNext

- राज चिंचणकर

मराठी चित्रपट -  तुझं तू माझं मी

लग्नाची गोष्ट हा विषय चित्रपटसृष्टीला नवीन नाही. हिंदी पडद्यावरच्या लग्नाच्या या गोष्टी अलीकडे मराठीतही सर्रास दिसून येतात. ‘तुझं तू माझं मी’ अर्थात टीटीएमएम हा चित्रपटही या पठडीत फिट्ट बसतो. एका तरुण आणि तरुणीची ही कथा थोड्या वेगळ्या वळणाने या चित्रपटात चितारली आहे. आजच्या तरुणाईच्या मनातले प्रतिबिंब यात पडलेले दिसते.
एका उद्योगपतीचा मुलगा असलेला जय आणि मध्यमवर्गीय घरातली राजश्री अशी जोडी या चित्रपटात आहे. दोघांच्या घरची मंडळी त्यांच्या लग्नाच्या मागे लागली आहेत आणि त्यामुळे हे दोघे पार हैराण झाले आहेत. त्यामुळे ते घर सोडून पळून निघाले आहेत. जय तर थेट लग्नाच्या मांडवातूनच बाहेर पडलेला आहे; तर न पटणाऱ्या विवाहस्थळांचा ससेमिरा चुकवण्यासाठी राजश्री घर सोडून निघाली आहे. प्रवासाच्या एका वळणावर या दोघांची एकमेकांशी गाठ पडते. प्रथम कुरबुरीवरून सुरू होणारे त्यांचे संभाषण, राजश्रीचे सामान चोरीला गेल्यावर वेगळ्या ट्रॅकवर जाऊन पोहोचते. पुढचा प्रवास ते दोघे एकमेकांच्या साथीने करायचे ठरवतात. पुढे गोव्याच्या वाटेवर एक पोलीस इन्स्पेक्टर त्यांच्या बाबतीत जो काही निर्णय घेतो; त्याची किंमत मोजत जय आणि राजश्रीची कथा पुढे चालत राहते.
कथा, पटकथा व संवादलेखक तेजपाल वाघ आणि दिग्दर्शक कुलदीप जाधव यांनी या चित्रपटाची धुरा सांभाळली आहे. ही कथा मांडण्याचा त्यांचा प्रयत्न चांगला असला, तरी चित्रपट रेंगाळल्यासारखा वाटत राहतो. काही वेळा तर चित्रपटात काही घडतच नाही असाही फील येतो. पण असे असले, तरी चित्रपटाला देण्यात आलेला फ्रेशनेस महत्त्वाचा आहे. परिणामी, ही कथा सुसह्य होते. कथेतले नातेसंबंध रंगवण्याचा प्रयत्न आश्वासक आहे. यात प्रमुख व्यक्तिरेखांसह येणाऱ्या इतर व्यक्तिरेखा त्यांच्या स्वभावानुसार चांगल्या रेखाटल्या आहेत. चित्रपटाची लोकेशन्स छान आहेत. कॅमेरावर्क व संगीताची बाजू ठीक आहे.
अभिनयाच्या पातळीवर हा चित्रपट बऱ्यापैकी तोलला गेला आहे. ललित प्रभाकर (जय) आणि नेहा महाजन (राजश्री) यांची केमिस्ट्री जुळून आली आहे. त्यांच्या फ्रेश चेहऱ्यांमुळे चित्रपटातही ताजेपणा आला आहे. सागर कारंडे व भारत गणेशपुरे यांच्या वाट्याला त्यांची खासियत असलेल्या भूमिका आल्या आहेत. विद्याधर जोशी, सविता प्रभुणे, सतीश पुळेकर, सीमा देशमुख, शर्वरी लोहोकरे आदी कलावंतांनी अनुभवाच्या जोरावर त्यांच्या भूमिका छान रंगवल्या आहेत. पुष्कर लोणारकर त्याच्या नेहमीच्याच स्टाईलमध्ये आहे. दोन घटका निव्वळ करमणूक हवी असेल, तर या ‘टीटीएमएम’मुळे टीपी, अर्थात टाइमपास मात्र होऊ शकतो.

Web Title: Reflection of the young man in the wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.