पसंत पडली वहिनी; रणबीरच्या बहिणीचं आलियाला खास गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2018 12:42 PM2018-06-01T12:42:52+5:302018-06-01T12:45:07+5:30

एकीकडे रणबीरने हे नातं नवीन आणि आनंद देणारं असल्याचं सांगितलं तर दुसरीकडे आलियानेही एका मुलाखतीत रणबीरबाबत काहीच न बोलता खूप काही बोलून गेली. 

Ranbir Kapoor's sister has a special gift for Alia Bhatt. See pic | पसंत पडली वहिनी; रणबीरच्या बहिणीचं आलियाला खास गिफ्ट

पसंत पडली वहिनी; रणबीरच्या बहिणीचं आलियाला खास गिफ्ट

googlenewsNext

मुंबई : रणबीर कपूरने नुकतंच आलियासोबतच्या नात्याचा स्वीकार केला असून या दोघांचं हे नातं रणबीरच्या कुटूंबियांनाही पसंत असल्याचं दिसतंय. एकीकडे रणबीरने हे नातं नवीन आणि आनंद देणारं असल्याचं सांगितलं तर दुसरीकडे आलियानेही एका मुलाखतीत रणबीरबाबत काहीच न बोलता खूप काही बोलून गेली. 

आता यात नव्या अपडेटनुसार, रणबीरची बहीण रिद्धीमाने आलिया भट्टला एक खास ब्रेसलेट गिफ्ट केलंय. या ब्रेसलेटचा फोटो आलियाने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. हे गिफ्ट मला खूप आवडलं असं कॅप्शनही आलियाने फोटोला दिलं आहे. 

गेल्या काही दिवसांपासून आलिया आणि रणबीरच्या परिवारातील सदस्यांचीही जवळीक चांगलीच वाढलेली बघायला मिळाली. आलियाच्या एका फोटोवर रणबीरच्या आईनेही कमेंट केली होती. तिचं खूप कौतुकही केलं होतं. 

काही दिवसांपूर्वीच आलियाने ऋषी कपूर यांच्यासोबत काम करण्याची इच्छा ट्विट करुन व्यक्त केली होती. अशात रणबीर एका मुलाखतीतून दोघांच्या नात्याचं चित्र स्पष्ट केलंय. पण रणबीरचे आधीचे अफेअर बघता हे किती दिवस टिकेल हे बघणेही महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान आलिया आणि रणबीर हे करण जोहरच्या ब्रम्हास्त्र या सिनेमात एकत्र दिसणार आहेत.

Web Title: Ranbir Kapoor's sister has a special gift for Alia Bhatt. See pic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.