'रमन राघव २.०' मधून अनुराग कश्यपची धम्माल पहायला मिऴणार - नवाजुद्दीन सिद्दिकी

By Admin | Published: April 28, 2016 06:49 PM2016-04-28T18:49:30+5:302016-04-28T18:49:30+5:30

आगामी 'रमन राघव २.०' या चित्रपटातच्या माध्यमातून दिग्दर्शक अनुराग कश्यप मोठी धूम उडवून देणार असल्याचे या चित्रपटात भूमिका साकारणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी याने सांगितले.

'Raman Raghav 2.0' will help Anurag Kashyap feel confident - Nawazuddin Siddiqui | 'रमन राघव २.०' मधून अनुराग कश्यपची धम्माल पहायला मिऴणार - नवाजुद्दीन सिद्दिकी

'रमन राघव २.०' मधून अनुराग कश्यपची धम्माल पहायला मिऴणार - नवाजुद्दीन सिद्दिकी

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ -  आगामी 'रमन राघव २.०' या चित्रपटातच्या माध्यमातून दिग्दर्शक अनुराग कश्यप मोठी धूम उडवून देणार असल्याचे या चित्रपटात भूमिका साकारणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी याने सांगितले. 
'रमन राघव २.०' चित्रपटातच्या माध्यमातून दिग्दर्शक अनुराग कश्यप जबरदस्त पुन्हा बॉलिवुडमध्ये आगमन करत आहे आणि याबद्दल मला पूर्णपणे विश्वास आहे. त्यामुळे मी बिधास्त बोलू शकतो. तसेच, त्याच्या अनेक चित्रपटांमधून सर्वोत्कृष्ठ चित्रपट म्हणून 'रमन राघव २.०' ओऴखला जाणार आहे. कारण, हा चित्रपट बनविण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली असल्याचे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीने सांगितले. अनुराग कश्यपने गेल्या वेऴेस दिग्दर्शित केलेला 'बॉम्बे वेलवेट' हा म्हणावा तसा चालला नव्हता. अनुराग कश्यप सोबत नवाजुद्दीन सिद्दीकीने ब्लॅक फ्रायडे आणि गॅंग ऑफ वॉसेवूर या चित्रपटात काम केले आहे. 
'रमन राघव २.०'  या चित्रपटाला सायको रमन नावाने सुद्धा ओऴखले जाते.  'रमन राघव २.०' ची कहाणी मध्य मुंबईतील १९६० च्या दशकातील एका मनोरुग्ण सिरियल किलरवर आधारित आहे. 
'रमन राघव २.०'  हा चित्रपट २४ जूनला प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: 'Raman Raghav 2.0' will help Anurag Kashyap feel confident - Nawazuddin Siddiqui

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.