प्रियंका चोपडा नीरव मोदीसोबतचे सर्व करार तोडणार, वाचा प्रियंका-मोदी कनेक्शन!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 12:03 PM2018-02-16T12:03:31+5:302018-02-16T17:33:31+5:30

पंजाब नॅशनल बॅँकेच्या मुंबई शाखेत ११ हजार ४०० कोटी रूपयांचा घोटाळा करणाºया नीरव मोदीसोबतचे सर्व करार अभिनेत्री प्रियंका चोपडा तोडण्याच्या तयारीत आहे.

Priyanka Chopra will break all the deals with Modi, read Priyanka-Modi connection! | प्रियंका चोपडा नीरव मोदीसोबतचे सर्व करार तोडणार, वाचा प्रियंका-मोदी कनेक्शन!

प्रियंका चोपडा नीरव मोदीसोबतचे सर्व करार तोडणार, वाचा प्रियंका-मोदी कनेक्शन!

googlenewsNext
जाब नॅशनल बॅँकेच्या मुंबई शाखेत ११ हजार ४०० कोटी रूपयांचा घोटाळा करणाºया नीरव मोदीसोबतचे सर्व करार अभिनेत्री प्रियंका चोपडा तोडण्याच्या तयारीत आहे. प्रियंका याविषयी कायदेशीर सल्ला घेत असल्याचे तिच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे. मात्र त्याचबरोबर प्रियंकाने मोदीला कायदेशीर नोटीस पाठविल्याचे वृत्त निराधार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 

प्रियंकाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘माध्यमांमध्ये प्रियंका नीरव मोदीविरोधात न्यायालयीन खटला दाखल करणार असल्याचे वृत्त सातत्याने समोर येत आहेत. परंतु हे वृत्त पूर्णत: निराधार आहे. मात्र नीरव मोदीने केलेला कोट्यवधी रूपयांचा घोटाळा लक्षात घेता, प्रियंका त्याच्यासोबतचे सर्व करार तोडण्याच्यादृष्टीने कायदेशीर सल्ला घेत आहे.’ सध्या प्रियंका ‘क्वांटिको’ या मालिकेच्या तिसºया सीजनच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचबरोबर ती काही हॉलिवूडपटांवरही काम करीत आहे. प्रियंका जानेवारी २०१७ मध्ये ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नीरव मोदीच्या लक्झरी डायमंड ज्वेलरी ब्रॅण्डशी जोडली गेली आहे. 

दरम्यान, पीएनबीच्या तक्रारीनंतर सीबीआयने नीरव मोदी, त्याचा भाऊ विशाल, पत्नी एमी आणि मेहुणा चिनूभाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, ईडीने नीरव मोदीसहीत या प्रकरणातील अन्य संशयित आरोपींच्या मालमत्तांवर छापा टाकून पाच हजार १०० कोटींची संपत्ती जप्त केली आहे. या प्रकरणातील सर्व संशयित डायमंड्स आर यूएस, सोलर एक्सपोर्ट्स आणि स्टेलर डायमंड्समध्ये भागीदार होते. 



प्रियंकाने मोदीवर उधळली स्तुतिसुमने
नीरव मोदीने डायमंड्सच्या एका लक्झरी ब्रॅण्डसाठी प्रियंका चोपडाची गतवर्षी ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड केली होती. मात्र प्रियंकासोबत केलेल्या कराराच्या रक्कमेची पूर्तता केली नसल्याने प्रियंकाने मोदीला कायदेशीर नोटीस बजावल्याची चर्चा होती. मात्र आता येत असलेल्या माहितीनुसार प्रियंकाने हा घोटाळा समोर येण्याअगोदरच मोदीसोबतचे नाते तोडले होते. दरम्यान, गेल्यावर्षी जेव्हा प्रियंकाला ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून घोषित केले होते, तेव्हा तिने नीरव मोदीवर चांगलीच स्तुतिसुमने उधळली होती. त्याचबरोबर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत तिने एका जाहिरातीचे शूटिंगही केले होते. 

या स्टार्सचेही मोदी कनेक्शन
सूत्रानुसार, नीरव मोदीचा पीएनबी घोटाळा समोर आल्यानंतर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राही त्याच्याविरोधात कायदेशीर खटला दाखल करण्याचा विचार करीत आहे. दरम्यान, मोदीच्या ज्वेलरी ब्रॅण्ड्सबरोबर केवळ प्रियंका आणि सिद्धार्थ हे दोनच कलाकार जोडलेले नसून, केट विन्सेंट आणि डकोटा जॉन्सन या दोघांच्या नावांचा समावेश आहे. या दोघांनी मोदीच्या ज्वेलरी ब्रॅण्ड्साठी एका फॅशन शोमध्ये रॅम्पवॉक केला आहे. 

Web Title: Priyanka Chopra will break all the deals with Modi, read Priyanka-Modi connection!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.