विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 08:54 AM2024-05-10T08:54:50+5:302024-05-10T08:54:50+5:30

प्राजक्ताने काल पोस्ट केलेल्या फोटोमुळे चर्चांना उधाण आले. आता प्राजक्ताने नेमक्या कोणत्या कागदपत्रांवर सही केली, याविषयी नेटकऱ्यांनी अंदाज लावलाय (prajakta mali)

Prajakta Mali sign on this documents new photo viral on social media | विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज

विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री. प्राजक्ताला आपण गेल्या अनेक वर्षांपासून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो मध्ये पाहतोय. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमध्ये खुमासदार सूत्रसंचालन करुन प्राजक्ताने प्रेक्षकांच्या मनात राज्य केलं. प्राजक्ता नुकतीच एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलीय. काल तिने एक फोटो शेअर केला. यात तिच्यासोबत तिची आई दिसतेय. प्राजक्ताने एका भल्यामोठ्या कागदपत्रांवर सही केली. ही कागदपत्रं नेमकी कोणत्या गोष्टीची आहेत, याविषयी लोकांनी काय अंदाज लावलेत बघा.

प्राजक्ताने हा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, "मी २३ एप्रिलला आयुष्यातील बहुप्रतिक्षित कागदपत्रांवर सही केली. ही विवाह नोंदणी नाही, याची कृपया दखल घ्यावी.", असं कॅप्शन प्राजक्ताने लिहिलं होतं. त्यामुळे नेटकऱ्यांनी प्राजक्ताच्या फोटोंवर कमेंट करायला सुरुवात केली. प्राजक्ताने नवीन फार्महाऊस घेतलंय, आणि त्याच्या कॉन्ट्रॅक्टवर प्राजूने सही केलीय, असा अंदाज नेटकऱ्यांनी लावलाय.

याशिवाय काही लोकांना असंही वाटतंय की,  प्राजक्ताने लिहिलेल्या कविता आता गाण्याच्या अल्बममध्ये रुपांतरीत होणार. त्याच्या करारावर प्राजूने सही केलीय, असाही अंदाज पुढे येतोय. आता यामागचं सत्य काय हे आज कळणार आहे. प्राजक्ता आज सोशल मीडियावर तिने नेमक्या कोणत्या कागदपत्रांवर सही केली, हे आज ती जाहीर करणार आहे. त्यामुळे खुलासा होईलच! stay tuned

Web Title: Prajakta Mali sign on this documents new photo viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.