सर्वात जास्त मानधन घेणारे टीव्ही कलाकार, कमाई वाचून तुम्हीही व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 03:31 PM2018-03-29T15:31:42+5:302018-03-29T15:33:58+5:30

टीव्ही कलाकारांचं स्टारडम पाहून त्यांना किती पैसा मिळत असेल याचा अंदाज अनेकांना येत असेल. पण खरंच त्यांना किती पैसे मिळत असतील याची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

The most expensive TV star, you will be able to read the earnings | सर्वात जास्त मानधन घेणारे टीव्ही कलाकार, कमाई वाचून तुम्हीही व्हाल हैराण

सर्वात जास्त मानधन घेणारे टीव्ही कलाकार, कमाई वाचून तुम्हीही व्हाल हैराण

googlenewsNext

सध्या टीव्ही इंडस्ट्रीला जास्तच चांगले दिवस आले आहेत. बॉलिवूड कलाकारांप्रमाणेच छोट्या पडद्यावरील कलाकारांचीही जोरदार चलती सुरू आहे. इतकेच काय तर आता टीव्ही कलाकारांनाही मानधन म्हणून मोठी रक्कम मिळत आहे. ज्यांची जितकी लोकप्रियता तितकी मोठी रक्कम असं सध्या चित्र आहे. टीव्ही कलाकारांचं स्टारडम पाहून त्यांना किती पैसा मिळत असेल याचा अंदाज अनेकांना येत असेल, पण खरंच त्यांना किती पैसे मिळत असतील याची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

 १) कपिल शर्मा : 

कॉमेडीयन कपिल शर्मा याने एका कॉमेडी शोच्या माध्यमातून कामाला सुरूवात केली होती. त्यानंतर तो चांगलाच लोकप्रिय झाला आणि त्याने ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा’ आणि नंतर ‘द कपिल शर्मा शो’च्या माध्यमातून धमाका उडवून दिला. त्याच्या नावावर शो विकला जाऊ लागल्याने अर्थातच त्याची किंमत वाढली. कपिल शर्मा सध्या छोट्या पडद्यावर सर्वात जास्त मानधन घेणारा कलाकार आहे. कपिल शर्मा हा त्याच्या कार्यक्रमांच्या प्रत्येक एपिसोडसाठी तब्बल ६० ते ७० लाख रूपये मानधन घेत असल्याचे बोलले जाते.

 २) सुनील गोव्हर : 

कपिल शर्माप्रमाणे सुनील ग्रोव्हर याचीही मोठी लोकप्रियता आहे. सर्वाधिक मानधन घेणा-या कलाकारांच्या यादीत तो दुस-या क्रमांकावर आहे. सुनील हा त्याच्या कार्यक्रमाच्या एका एपिसोडसाठी १० ते १२ लाख रूपये मानधन घेतो. 

३) मिशाल रहेजा :

‘इश्क दा रंग सफेद’, ‘लागी तुझसे लगन’ सारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता मिशाल याने या यादीत तिस-या क्रमांकावर उडी घेतल्याने सर्वांनाच धक्का बसलाय. मिशाल एका एपिसोडसाठी १ ते 2 लाख रूपये मानधन घेत असल्याची माहिती आहे. त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. 

४) रोनित रॉय, राम कपूर :

रोनित रॉय आणि राम कपूर हे दोन्ही चेहरे मोठ्या आणि छोट्या पडद्यावर चांगलेच लोकप्रिय आहेत. मात्र, सिनेमापेक्षा आपण त्यांना टीव्हीवरच अधिक बघतो. या दोघांनी अनेक मालिका गाजवल्या आणि अजूनही ते मालिकांमध्ये काम करत आहेत. हे दोन्ही कलाकार त्यांच्या एका एपिसोडसाठी १.२५ लाख रूपये मानधन घेतात. 

५) हिना खान-करन पटेल:

हिना खान ही छोट्या पडद्यावरील सद्याची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. तर अभिनेत्यांच्या यादीत करन पटेल याचा नंबर लागतो. त्यात हिना खान ही ‘बिग बॉस’मध्ये सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. हिना खान आणि करन पटेल हे दोघेही मालिकेच्या एका एपिसोडसाठी १.२५ लाख रूपये मानधन घेतात. 

६) जेनिफर विंगेट :

जेनिफर विंगेट ही टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात हॉट आणि सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. जेनिफरची ‘बेहद’ ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. त्यामुळे अर्थातच तिचेही भाव वधारले आहेत. जेनिफर एका मालिकेच्या एपिसोडसाठी १ लाख रूपये मानधन घेते. 

७) मनिष पॉल :

मनिष पॉल हा गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. वेगवेगळ्या रिअ‍ॅलिटी शोचं होस्टींग असो वा अवॉर्ड इव्हेंटचं मनिष सगळीकडे धमाका करतोय. मनिष ‘झलक दिखला जा’ च्या आगामी सीझनसाठी १.५ कोटी रूपये घेणार असल्याचं मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. आता यावरून मनिष पॉल याची लोकप्रियता किती आहे हे दिसून येतं.  

Web Title: The most expensive TV star, you will be able to read the earnings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.