या मराठी अभिनेत्री गाजविणार २०१७

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2017 06:47 PM2017-01-03T18:47:46+5:302017-01-03T18:47:46+5:30

   बेनझीर जमादार मराठी चित्रपट इंडस्ट्री बहरते आहे. गतवर्षी अनेक मराठी चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर आपला दबदबा कायम राखला. यंदाही ...

This will be the Marathi actress of 2017 | या मराठी अभिनेत्री गाजविणार २०१७

या मराठी अभिनेत्री गाजविणार २०१७

googlenewsNext
   बेनझीर जमादार


मराठी चित्रपट इंडस्ट्री बहरते आहे. गतवर्षी अनेक मराठी चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर आपला दबदबा कायम राखला. यंदाही मराठीतील कलाकार नव्या दमासह अनेक चित्रपट करण्यास तयार आहेत. यात मराठी अभिनेत्रीही मागे नाहीत. २०१७ हे वर्ष मराठी अभिनेत्रींचे असेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. या वर्षी कोणत्या अभिनेत्री आपला जलवा दाखविण्यास तयार आहेत, यावर टाकलेली ही नजर...

सोनाली कुलकर्णी - प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसाठी हे वर्ष खूपच खास असणार आहे. कारण हे तिचे मराठी चित्रपटसृष्टीतील दहावे वर्ष आहे. यावर्षी ती दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकरदेखील झळकणार आहेत.  तसेच  ती यंदा तिचे दहावे वर्ष साजरा करण्यासाठी सज्ज झाली आहे. 



अमृता खानविलकर - या अभिनेत्रीने आपल्या नृत्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. वर्षाच्या सुरूवातीलाच अमृता एका रिअ‍ॅलिटी शोचे परीक्षण करताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर ती यंदा वैभव तत्ववादीसोबत एका आगामी चित्रपटात झळकणार आहे. त्यामुळे वैभव तत्ववादी आणि अमृता खानविलकर अशी भन्नाट जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 



सई ताम्हणकर - आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री सई ताम्हणकरचा यावर्षी राक्षस हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटात तिच्यासोबत प्रेक्षकांना अभिनेता शरद केळकर पाहायला मिळणार आहे. मात्र मराठी चित्रपटसृष्टीत प्रेक्षकांना यंदा ही हटके जोडी पाहायला मिळणार आहे. 



उर्मिला कोठारे - आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकणारी ही अभिनेत्री करार या चित्रपटाने नवीन वर्षाची दमदार एन्ट्री करणार आहे. तसेच ती तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर यांचे अलौकिक जीवन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांच्या आयुष्यावर बेतलेला विठा या मराठी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती विठाबाई नारायणगांवकर यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अशाप्रकारे ही अभिनेत्रीदेखील २०१७ यावर्षात आपला जलवा दाखविण्यास तयार झाली आहे.


                

प्रिया बापट - मराठी चित्रपटसृष्टीची ही चुलबुली अभिनेत्री यंदा गच्ची या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर ती चाहत्यांना एक सरप्राईज देणार असल्याचे कळते आहे. ते म्हणजे, टाइमप्लीज या चित्रपटानंतर प्रिया आणि उमेश कामत ही प्रेक्षकांची लाडकी जोडी यंदा २०१७ हे वर्ष गाजविण्यास सज्ज झाले आहे. 



क्रांती रेडकर - प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री लवकरच करार या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे यंदा तिचा ट्रकभर स्वप्न हा चित्रपटदेखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे क्रांतीसाठी हे वर्ष झक्कास असणार आहे असे म्हणण्यास हरकत नाही.  तसेच  ती या दोन्ही चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविण्यास तयार झाली आहे. 



प्रार्थना बेहेरे - या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनामध्ये जागा निर्माण केली आहे. विशेष म्हणजे ही अभिनेत्री यंदा दिग्गज अभिनेता सचिन पिळगांवकरसोबत पाहायला मिळणार आहे. तसेच तिचा फुगे हा चित्रपटदेखील प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सुबोध भावे आणि स्वप्नील जोशी हे तगडे कलाकार पाहायला मिळणार आहे. 





 

Web Title: This will be the Marathi actress of 2017

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.