वैदेहीला बनायचंय एक चांगली अभिनेत्री, ‘सिंबा’च्या बहिणीचं स्वप्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 12:50 PM2018-12-21T12:50:37+5:302018-12-21T12:52:33+5:30

मराठीसह हिंदी सिनेमातही वैदेहीने काम केले आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह ती वजीर सिनेमातही झळकली होती. या सिनेमात छोटी भूमिका असली तरी बिग बींसह स्क्रीन शेअर केलेल्या वैदेहीच्या भूमिकेचे कौतुक झालं.

Vaidehi wants to make a good actress, dream of 'Sibaba' sister | वैदेहीला बनायचंय एक चांगली अभिनेत्री, ‘सिंबा’च्या बहिणीचं स्वप्न

वैदेहीला बनायचंय एक चांगली अभिनेत्री, ‘सिंबा’च्या बहिणीचं स्वप्न

googlenewsNext

अभिनेत्री वैदेही परशुरामी हिनं आपल्या दर्जेदार भूमिकांनी अल्पावधीतच रसिकांची मनं जिंकली आहेत. रुपेरी पडद्यावर कांचन घाणेकर ही व्यक्तीरेखा साकारत वैदेहीने आपल्यातील अभिनय कौशल्य दाखवून दिले. नुकतंच ती रणवीर सिंह स्टारर आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंबा सिनेमातून रुपेरी पडद्यावर झळकली आहे. या सिनेमात वैदेहीने सिंबाच्या बहिणीची भूमिका साकारली असून तिची ही भूमिका विशेष लक्षवेधी आहे.

 

रसिकांनी आपल्याला केवळ हिरोईन म्हणून न पाहता एक चांगली अभिनेत्री म्हणून ओळखावं असं वैदेहीने म्हटले आहे. मात्र गेल्या काही दिवसांत साकारलेल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमधून ऑनस्क्रीन इमेज बदलण्याचा आपला प्रयत्न नसल्याचेही वैदेहीने स्पष्ट केले आहे. याआधी वैदेहीने वृंदावन, कोकणस्थ, एफयू, वेड लावी जीवा,आणि डॉ. काशीनाथ घाणेकर अशा विविध मराठी सिनेमांत भूमिका साकारल्या आहेत. महेश मांजरेकर यांच्या एफयू सिनेमातून वैदेहीला विशेष ओळख मिळाली.

मराठीसह हिंदी सिनेमातही वैदेहीने काम केले आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह ती वजीर सिनेमातही झळकली होती. या सिनेमात छोटी भूमिका असली तरी बिग बींसह स्क्रीन शेअर केलेल्या वैदेहीच्या भूमिकेचे कौतुक झालं. मुंबईत जन्म झालेल्या वैदेहीने विधी शाखेची पदवी घेतली आहे. यासह तिने काही जाहिरातींमध्येही काम केले आहे. तिने कथ्थकचेही प्रशिक्षण घेतले आहे. आता सिंबाची ही बहिण रसिकांवर कशी जादू करणार हे पाहावं लागणार आहे. तसंच या सिनेमामुळे ती बॉलीवुडमध्येही स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरते का हे पाहणं रंजक ठरणार आहे. 

Web Title: Vaidehi wants to make a good actress, dream of 'Sibaba' sister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.