संदीप कुलकर्णी, ह्रषिकेश जोशी यांचे दहीहंडीचं खास गाणं लाँच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 12:03 PM2018-09-03T12:03:51+5:302018-09-03T12:04:45+5:30

बेभाम गोविंदांच्या रंगील्या खेळीला सलाम करणारं हे दहीहंडीचं खास गाणं... ज्यात संदीप कुलकर्णी, ह्रषिकेश जोशी आणि अमोल पराशर यांच्या मिश्कील हावभावांनी चार चांद लावले आहेत. संदीप कुलकर्णी यांचा हा अंदाज पहिल्यांदाच या गाण्यातून प्रेक्षकांसमोर आला आहे.

sandeep kulkarni, Hrishikesh Joshi Dahi handi's special song launch | संदीप कुलकर्णी, ह्रषिकेश जोशी यांचे दहीहंडीचं खास गाणं लाँच

संदीप कुलकर्णी, ह्रषिकेश जोशी यांचे दहीहंडीचं खास गाणं लाँच

googlenewsNext

श्रावण सुरू झाला की, एका पाठोपाठ एक सणांची रांग लागते. प्रत्येक सणाची आपली वेगळीच धमाल... वेगळीच मस्ती असते.... याच अनोख्या धमाल-मस्तीने नटलेला सण म्हणजे दहीहंडी... थरांचा थरार सादर करताना आपल्या माणसाला जपण्याची वृत्ती दरवर्षी या सणादरम्यान पाहायला मिळते. जल्लोषात साजरा होणाऱ्या या सणाचा जोश वाढवणारं संदीप कुलकर्णी यांच्या आगामी चित्रपटाचं धमाल गाणं नुकतंच लाँच करण्यात आलं आहे.

बेभाम गोविंदांच्या रंगील्या खेळीला सलाम करणारं हे दहीहंडीचं खास गाणं... ज्यात संदीप कुलकर्णी, ह्रषिकेश जोशी आणि अमोल पराशर यांच्या मिश्कील हावभावांनी चार चांद लावले आहेत. संदीप कुलकर्णी यांचा हा अंदाज पहिल्यांदाच या गाण्यातून प्रेक्षकांसमोर आला आहे. हे गाणे प्रेक्षकांच्या मनावर चांगलेच राज्य करणार यात काहीच शंका नाही.

करंबोला प्रोडक्शन्स प्रस्तुत मनाला भिडणारं हे दहीहंडीचं हे खास गाणं शैलेंद्र बर्वे यांनी संगीतबद्ध केलं असून चंद्रशेखर सानेकर यांनी गोविंदांचा थरार आणि जिद्द शब्दबद्ध केली आहे. तर हे शब्द थेट काळजाला भिडतात ते प्रवीण कुवर यांच्या आवाजात... संदीप कुलकर्णी आणि महेंद्र अटाळे निर्मित हे गाणं कोणत्या चित्रपटातलं आहे, हे अद्याप गुलदस्त्यात असलं तरी लवकरच यावरून पडदा उठणार आहे. या चित्रपटाची घोषणा लवकरच केली जाणार आहे.

संदीप कुलकर्णी, ह्रषिकेश जोशी यांनी आजवर एकाहून एक हिट मराठी चित्रपट दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या आगामी चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना नेहमीच लागलेली असते आणि त्यातही एकाच चित्रपटात ते दोघे एकत्र येणार असल्याने या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होणार यात काहीच शंकाच नाही. हा चित्रपट कोणत्या विषयावर असणार, या दोघांच्या व्यक्तिरेखा कोणत्या असणार हे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे.

दहीहंडीचं हे खास गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासून आता हा चित्रपट प्रेक्षकांना कधी पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. या गाण्यावरूनच या चित्रपटात एक वेगळा संदीप कुलकर्णी प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे कळून येत आहे. 

Web Title: sandeep kulkarni, Hrishikesh Joshi Dahi handi's special song launch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.