"रे राया... कर धावा'चा धमाकेदार ट्रेलर लाँच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 11:54 AM2018-07-09T11:54:50+5:302018-07-09T11:58:32+5:30

रे राया कर धावा या चित्रपटाचा आशय नेमकेपणानं व्यक्त करणारा धमाकेदार ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. या चित्रपटात अभिनेता भूषण प्रधान, संस्कृती बालगुडे, उदय टिकेकर, अभिजित चव्हाण, हंसराज जगताप, विवेक चाबुकस्वार, सुदर्शन पाटील, नयन जाधव, प्रकाश धोत्रे आदींच्या भूमिका आहेत.

re raya marathi film trailer launched | "रे राया... कर धावा'चा धमाकेदार ट्रेलर लाँच

"रे राया... कर धावा'चा धमाकेदार ट्रेलर लाँच

googlenewsNext

काहीतरी मिळवायचं असलं, की अपरिमित कष्ट करावे लागतात.. या प्रवासात अनेक अडथळे समोर येतात... हे अडथळे जो पार करतो, तोच स्वतःला सिद्ध करतो... रे राया कर धावा या चित्रपटाचा आशय नेमकेपणानं व्यक्त करणारा धमाकेदार ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. 

राधे मोशन पिक्चर्सनं या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. अजय सुखेजा यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून अनिता संजय पोपटानी या कार्यकारी निर्मात्या आहेत. चित्रपटाची कथा पटकथा संवाद हे किरण बेरड यांनी लिहिले आहेत आणि मिलिंद शिंदे यांनी दिग्दर्शन केलं आहे. प्रताप नायर यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले आहे तर अमित सोनावणे यांनी संकलन केले आहे. चित्रपटात अभिनेता भूषण प्रधान, संस्कृती बालगुडे, उदय टिकेकर, अभिजित चव्हाण, हंसराज जगताप, विवेक चाबुकस्वार, सुदर्शन पाटील, नयन जाधव, प्रकाश धोत्रे आदींच्या भूमिका आहेत. या चित्रपटात एकूण तीन गाणी असून ही गाणी मिलिंद शिंदे यांनी लिहिली आहेत. संगीतकार मंगेश धाकडे यांनी ही गाणी संगीतबद्ध केली आहेत. गायक जावेद अली, कैलाश खेर यांच्यासह वैशाली भैसने माडे, मंगेश धाकडे यांनी ही गाणी गायली आहेत.

मानाचा पुरस्कार हुकल्यानं शहरातला एक मोठा खेळाडू नाराज होऊन गावात येतो आणि तिथल्या गुणवत्तेला आकार देऊन त्यांना राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी कशा पद्धतीनं घडवतो, याचं उत्तम चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे. अॅथलेटिक्सवरचा हा पहिला मराठी चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी कुतूहल निर्माण झालं आहे. सोशल मीडियातही या चित्रपटाविषयी चर्चा आहे. 

'ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये विविध क्षमता असतात. मात्र, त्या क्षमतांना योग्य दिशा देण्याची गरज असते. योग्य दिशा मिळाल्यावर मुलं फार मोठी मजल मारू शकतात. अतिशय वास्तववादी पद्धतीनं हा चित्रपट हाताळला आहे. स्पोर्ट्स फिल्म हा अवघड प्रकार असतो. मात्र, या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना एक वेगळा विषय, वेगळं विश्व अनुभवायला मिळेल,' असं चित्रपटाचे दिग्दर्शक मिलिंद शिंदे यांनी सांगितलं.

 

Web Title: re raya marathi film trailer launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.