प्रथमेश परब दिसणार 'टकाटक'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 03:18 PM2019-04-08T15:18:52+5:302019-04-08T15:19:55+5:30

मराठी चित्रपट 'टकाटक'चे पहिले पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले.

Prathamesh Parab to appear in 'Takatak' | प्रथमेश परब दिसणार 'टकाटक'

प्रथमेश परब दिसणार 'टकाटक'

googlenewsNext
ठळक मुद्दे'टकाटक' या चित्रपटात पहायला मिळणार एका वेगळ्या धाटणीची सेक्स कॉमेडी

मराठी चित्रपट 'टकाटक'चे पहिले पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. पर्पल बुल एण्टरटेन्मेंट, व्ही. पतके फिल्म्स आणि गांववाला क्रिएशन्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘येड्यांची जत्रा’, ‘४ इडियट्स’, ‘जस्ट गंमत’, ‘शिनमा’ आणि ‘१२३४’ या चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या मिलिंद कवडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मिलिंद कवडे आणि अजय ठाकूर यांनी या चित्रपटाची गंमतीशीर कथा-पटकथा लिहीली असून संवाद संजय नवगीरे यांचे आहेत.


'टकाटक' या चित्रपटात एका वेगळ्या धाटणीची सेक्स कॉमेडी प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. प्रेमकथेसोबतच एक महत्त्वपूर्ण संदेशही या चित्रपटातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती  ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार, रवी बाहरी, इंदरजीत सिंग, अजय ठाकूर, धनंजय सिंग मासूम, रबिंद्र चौबे यांनी केली आहे. ‘टाइमपास’ फेम प्रथमेश परब या चित्रपटाचे मुख्य आकर्षण असून त्याच्या जोडीला ऋतिका श्रोत्री ही अभिनेत्री झळकणार आहे. याशिवाय अभिजीत आमकर, प्रणाली भालेराव, भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर हे कलाकारही या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.


‘टकाटक’च्या माध्यमातून पुन्हा एकदा एक नवीन विषय काहीशा वेगळ्या शैलीत सादर करण्याचा प्रयत्न केल्याचे मत दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी व्यक्त केले आहे. या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी हजरत शेख (वली) यांनी केली आहे. गीतकार जय अत्रे यांनी या चित्रपटासाठी गीतलेखन केले असून, संगीतकार वरुण लिखते यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. गायक आनंद शिंदे आणि श्रुती राणे यांनी या सिनेमातील गाण्यांना स्वरसाज दिला आहे. हा चित्रपट २८ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Prathamesh Parab to appear in 'Takatak'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.