प्रतिमा जोशी यांनी ‘आम्ही दोघी’मधून पाडला एक नवा पायंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2018 10:37 AM2018-03-06T10:37:16+5:302018-03-06T16:07:16+5:30

गेल्या १० वर्षात मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नवनव्या प्रगोगांची भर पडते आहे. अर्थपूर्ण कथा, उत्तम चित्रपट, सुंदर चित्रीकरण असे सगळे घडते ...

Prashoj Joshi 'A New Punishment That We Have Done' | प्रतिमा जोशी यांनी ‘आम्ही दोघी’मधून पाडला एक नवा पायंडा

प्रतिमा जोशी यांनी ‘आम्ही दोघी’मधून पाडला एक नवा पायंडा

googlenewsNext
ल्या १० वर्षात मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नवनव्या प्रगोगांची भर पडते आहे. अर्थपूर्ण कथा, उत्तम चित्रपट, सुंदर चित्रीकरण असे सगळे घडते आहे.मराठी चित्रपटाच्या इतिहासात या आधीचा टप्पा ग्रामीण भागाचे वर्चस्व असणारा होता आणि त्यादृष्टीने शहरातल्या माध्यमर्गीय लोकांना तो तितकासा  भिडत नव्हता.

प्रतिमा जोशी यांनी ‘आम्ही दोघी’च्या माध्यमातून एक नवा पायंडा पाडला आहे, नवे पाऊल टाकले आहे. कारण असे आहे की प्रसिद्ध लेखकाची लेखकृती घ्यायची,लिहिलेले संचित घ्यायचे आणि त्यात आपले काहीही घुसडायाचे तसेच त्या लेखकाचे नाव वापरायचे परंतु त्या अर्थाने त्या संहितेला न्याय द्यायचा नाही, असे सर्रास घडते. मात्र इथे असे दिसते की ‘आम्ही दोघी’मध्ये प्रतिमा जोशी यांनी कुठलीही तडजोड न करता गौरी देशपाडे यांच्या संहितेला न्याय दिला आहे. ‘पाऊस आला मोठा’नावाच्या गौरी देशपांडे यांनी त्यांच्या उत्तर आयुष्यात लिहिलेल्या लघुकथेवर ती बेतलेली आहे.

कारावासातून पत्र, एक एक पान गळावया, दुस्तरहागाट या सगळ्या कादंबऱ्या त्यांनी सुरुवातीला लिहिल्या आहेत पण लघुकथा लिहायला त्यांनी नंतर सुरवात केली.त्यांना तोही घाट चांगला जमला आहे. आता गौरी देशपांडेचे वैशिष्ट्य असे की त्या नेहरूवादी विचारांच्या चौकटीत जन्मल्यामुळे  एका अर्थाने भवतीच्या परिस्थितिबद्दलची आशा, अपेक्षा या गोष्टी त्यांच्या लिखाणात दिसतात. कमल देसाईंच्या कथेचा बाज हा त्यापेक्षा वेगळा होता, पण गौरी देशपांडे उदारमतवादीपणेबाईपणाच्या प्रश्नांशी भिडून स्त्रीयांनी व्यक्त होण्यासाठी काय केले पाहिजे याबद्दल अतिशय ठामपणे त्यांच्या लिखाणातून बोलत राहिल्या.

नेहरू यांनी इंदिरा यांना कारावासातुन पत्र लिहिली होती. गौरी देशपांडे इंग्रजी साहित्याच्या अभ्यासक असल्यामुळे त्यांनी ती नक्की वाचली होती आणि असे वाटते की त्यामुळेच नंतरच्या काळात कारावासातून पत्रे म्हणून त्यांनी संहिता लिहिली. त्यांचा कारावास कशासाठी आहे तर वैवाहिक कौटुंबिक चौकटीचा कारावास आहे. ‘श्यामची आई’पासून आपल्याकडे मराठी स्त्रियांवरती असलेले बाईपणाचे किंवा मातृत्वाचे ओझे अतिशय धीटपणे बाजूला सारून विवेकी पद्धतीने व्यक्त होण्यासाठी धडपड करतत्या वेगवेगळ्या संहितामधून शोध घेत होत्या.

प्रतिमा जोशी यांनी ‘आम्ही दोघी’मधील सावित्री अगदी बरोबर पकडली आहे. सावित्रीचा तिच्या वडिलांच्या वर्चस्वाशी असणारा झगडा आहे... आजूबाजूला नोकर चाकर आहेत, वर्गीय दृष्टिकोण आहे कारण ती ‘आहे रे’ वर्गातली आहे, स्पर्धेत भाग घेणारी आणि स्पर्धेमधून स्वतःला काहीतरी मिळवनारी अशी ती  आहे. त्याच्याविरुद्धअमला हे व्यक्तिमत्व साकारलेले आहे. सावित्रीचे वडिल वकील आहेत. त्यांच्या पेशाबद्दल सावित्रीला फार काही आदर आहे अस नाही. एके दिवशी तिचे वडिल एक बाई घेउन येतात ती सावित्रीपेक्षा सात आठ वर्षानी मोठी असते. ही माझी बायको असे जाहीर करतात. सावित्रीला याचा संताप येतो पण वकील नावाच्या हुकुमशहापुढे तिला त्या अर्थाने बोलता येत नाही, पण ती तिचा निषेध तिच्या पद्धतीने नोंदवते.

मला असे वाटते की प्रतिमा जोशी यांचे कौशल्य हे की त्यांनी संहिता नीट वाचून एखाद्या लेखकाला न्याय दयायचा म्हणजे काय करायचे हे नीट साकारले आहे. असे म्हणतात की, reading against the grain of the text. म्हणजे त्या लेखकाने काय म्हटले आहे ते प्रामाणिकपणे समजुन घ्यायचे आणि काय म्हटले नाही तेही समजुन घ्यायचे. त्याअर्थाने प्रतिमा जोशी यांनी मातृत्व किंवा स्त्रीत्व ह्या अडसर नाही हे लेखिकेचे म्हणणे सार्थपणे साकारले आहे.

मला असे वाटते की सत्तरीच्या दशकानंतर एका नव्या युगाला, आधुनीकिकरणाला सुरवात झाली. त्याचा एक वेध गौरी देशपांडेनी घेतला आहे. तो प्रतिमा जोशींना कळल्याने पात्रे योग्यरित्या साकारली गेली आहेत. सावित्री पु शी रेग्यांच्या कादंबरीतल्या सावित्रीचे नाव आहे, असे वाटते. पण पु शी रेग्यांच्या कादंबरीतली सावित्री खुप गाजली होती. गौरी देशपांडेच्या लहानपणी त्यांनी रेग्यांची कादबंरी नक्की वाचली असणार. पण तिला बगल देऊन गौरी देशपांडे यांनी या कथेतील सावित्री निर्माण केली.

यातील अमला हे नाव बंगालीशी जवळचे वाटते. मला शंका आहे की बंगाली साहित्यामधे अमला नावाची नायिका असू शकते.   अम्मी आणि अमला ही नवे कुठेतरी दक्षिणेच्या बाजुला म्हणजे बेलगाव म्हणा, कर्नाटक म्हणजे महाराष्ट्राच्या सीमा भागात राहणाऱ्या कुटुंबामधली आहेत,असे वाटते.

सावित्रीच्या वडिलांना वाटते की तिला जोड़ीदार मिळावा. म्हणजे लग्नामधे फक्त अभिलाषा नाही आहे. आता हे सगळे मराठी प्रेक्षकांना गुंतागुंतीचे  आहे.  एकअर्थी हेतरल पद्धतीने उलगडून दाखवणे हे आव्हान होते आणि ते प्रतिमा जोशींनी पेलले आहे. सगळ्यात चांगली गोष्ट अशी की गतिशीर माध्यामाचा अतिशय चांगला वापरत्यांनी केला आहे. मी असे म्हणेन की गौरी देशपांडे यांच्या साहित्याला कथेला पूर्ण न्याय देणारी अशी कलाकृती प्रतिमा जोशी यांनी साकारली आहे.

Web Title: Prashoj Joshi 'A New Punishment That We Have Done'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.