मनिषा केळकर फॉर्म्युला फोर स्पर्धेत होणार सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 10:27 AM2018-07-09T10:27:16+5:302018-07-09T10:29:00+5:30

मनिषा आता अभिनयानंतर आणखी एका क्षेत्रात तिचे भाग्य आजमावणार आहे. नुकत्याच सुरु झालेल्या फॉर्म्युला फोर या कार रेसिंग स्पर्धेत भारतातल्या साठ जणींमधून निवड झालेल्या सहा जणींमध्ये महाराष्ट्रातली एकमेव स्पर्धक म्हणून मनिषाचा समावेश आहे.

Manisha Kelkar will be participating in the Formula 4 tournament | मनिषा केळकर फॉर्म्युला फोर स्पर्धेत होणार सहभागी

मनिषा केळकर फॉर्म्युला फोर स्पर्धेत होणार सहभागी

googlenewsNext

मनिषा केळकरने आजवर अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करत आहे. तिच्या आजवरच्या अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. मनिषाला आता एका चित्रपटाची लॉटरी लागली आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. कारण आता मराठी, हिंदी चित्रपटानंतर इंग्रजी चित्रपटामध्ये झळकणार आहे. इसीस हा चित्रपट आपल्याला हिंदीत पाहायला मिळाला होता. पण आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांना इंग्रजीत पाहायला मिळणार असून या चित्रपटात मनिषा एका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मनिषा सध्या या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. पण त्याचसोबत ती आणखी एका गोष्टीत बिझी आहे. 
मनिषा आता अभिनयानंतर आणखी एका क्षेत्रात तिचे भाग्य आजमावणार आहे. नुकत्याच सुरु झालेल्या फॉर्म्युला फोर या कार रेसिंग स्पर्धेत भारतातल्या साठ जणींमधून निवड झालेल्या सहा जणींमध्ये महाराष्ट्रातली एकमेव स्पर्धक म्हणून मनिषाचा समावेश आहे. कोइम्बतूरमध्ये रंगणाऱ्या ‘फॉर्म्युला फोर’ या कार रेसिंग स्पर्धेमध्ये उतरणाऱ्या सहा महिला स्पर्धकांपैकी ती एक आहे. या स्पर्धेमध्ये भारतातल्या व्यावसायिक पुरुष स्पर्धकांशी महिला स्पर्धकही टक्कर घेताना दिसतील. मनिषा सध्या कोइम्बतूरमध्येच असून तिचं प्रशिक्षण सुरू आहे. 
कोइम्बत्तूर आणि त्यानंतर दिल्ली या दोन ठिकाणी या स्पर्धा पार पडणार आहेत. पुढेच चार महिने ही स्पर्धा सुरू राहणार असल्याने मनिषा त्यासाठी खूप मेहनत घेतेय. एवढ्या मोठ्या रेसिंगसाठी निवड झाली असल्याने ती सध्या चांगलीच खुश आहे. मनिषाला कार रेसिंगची अनेक वर्षांपासून आवड आहे. आज तिच्या या आवडीमुळेच ती इथपर्यंत पोहोचू शकली आहे. 
मनीषा केळकर 'इसीस 2' या इंटरनॅशनल इंग्रजी सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून या चित्रपटातील भूमिका तिच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन युवा अभिनेता युवराज कुमार करणार असून मनीषा एका बंगाली तरुणीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. अभिनय हे तिचे पहिले प्रेम असल्याने ती या सगळ्यातून वेळात वेळ काढून या चित्रपटाचे देखील चित्रीकरण करत आहे. 

Web Title: Manisha Kelkar will be participating in the Formula 4 tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.