सौंदर्याचं मर्म उलगडणारा ‘जश्न-ए-हुस्न’!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2018 07:47 AM2018-04-07T07:47:56+5:302018-04-07T13:17:56+5:30

कला आणि सौंदर्य यांचे एकमेकांशी अतूट नाते आहे.सौंदर्याचा आविष्कार म्हणूनच कलेकडे पहावे लागेल.रसिकतेने ते सौंदर्य अनुभवत कलेच्या आगळ्या आविष्काराचा ...

'Jashn-e-Husn', the beauty of beauty! | सौंदर्याचं मर्म उलगडणारा ‘जश्न-ए-हुस्न’!

सौंदर्याचं मर्म उलगडणारा ‘जश्न-ए-हुस्न’!

googlenewsNext
ा आणि सौंदर्य यांचे एकमेकांशी अतूट नाते आहे.सौंदर्याचा आविष्कार म्हणूनच कलेकडे पहावे लागेल.रसिकतेने ते सौंदर्य अनुभवत कलेच्या आगळ्या आविष्काराचा आनंद “जश्न-ए-हुस्न” या सांगीतिक कार्यक्रमातून प्रेक्षकांना मिळणार आहे.संगीत आणि नृत्याच्या माध्यमातूनच तिचा साजशृंगार, तिचं सौंदर्य याची ओळख करून देण्याचा प्रयत्न झाला तर तो रसिक मनावर ठसेल आणि अंतरी रुळेल हे जाणून ज्येष्ठ गायिका राणी वर्मा यांनी “जश्न-ए-हुस्न” हा अनोखा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. सिस्टर कनर्सन एन्टरटेंन्मेंट आणि राणी वर्मा यांची प्रस्तुती असलेल्या या कार्यक्रमाचा ‘श्रीगणेशा’ ८ मार्चला महिला दिनाच्या शुभमुहूर्तावर झाला. रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या कार्यक्रमाचा दुसरा प्रयोग शुक्रवार १३ एप्रिलला रात्रौ ८.०० वा. रविंद्र नाट्यमंदिर येथे रंगणार आहे.तर तिसरा रविवार १५ एप्रिलला ठाणे येथील डॉ.काशिनाथ घाणेकर सभागृहात रात्रौ ८.३० वा. संपन्न होईल.  



भारतीय हिंदी सिनेसंगीताने कित्येक पिढ्यांच्या रसिकांचे भावविश्व व्यापून टाकले आहे.असंख्य गीतांमधून स्त्री सौंदर्याची विलोभनीय वर्णने आपण अनुभवलेली आहेत.या कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती राणी वर्मा यांची आहे.पहिल्या प्रयोगाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि नागेश प्रसाद यांनी केले होते.दुसऱ्या प्रयोगाचे सूत्रसंचालन मराठीतील आघाडीची अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोले आणि सुनील मटू करणार आहेत.दिग्दर्शन संदीप पडियार, लेखन डॉ. सुनील देवधर,संगीत संयोजन दिलीप पोतदार, कोरिओग्राफी विश्वास नाटेकर, प्रकाशयोजना अमोघ फडके तर ग्राफिक्स आणि व्हीएफएक्स सचिन जाधव यांनी केले आहे.श्लोक चौधरी, श्रीरंग भावे, ज्योतिका शर्मा, अर्चना गोरे, मनिष आणि नवीन त्रिपाठी अशा आघाडीच्या गायकांचा स्वरसाज या कार्यक्रमाला लाभला आहे.या अनोख्या संकल्पनेबद्दल बोलताना गायिका राणी वर्मा सांगतात की, ‘स्त्री सौंदर्याशी निगडीत अनेक लोकप्रिय गीतांतून आणि तितक्याच लयबद्ध नृत्याविष्कारातून, त्यातील भावभावनांचे लोभसवाणे सादरीकरण प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा या संपूर्ण समूहाचा प्रयत्न आहे'.“जश्न-ए-हुस्न” हा मोहवणारा एक परिपूर्ण कलाविष्कार सर्व कलाप्रेमींना नक्कीच आवडेल असा विश्वास राणी वर्मा व्यक्त करतात.

Web Title: 'Jashn-e-Husn', the beauty of beauty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.