दोस्तीगिरी सिनेमाचे पोस्टर झाले लाँच !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 07:10 AM2018-06-15T07:10:41+5:302018-06-15T12:40:41+5:30

शाळा आणि महाविद्यालयातली मैत्री ही नि:स्वार्थ, निरागस, आणि निखळ असते. कॉलेजच्या कट्ट्यावर भेटलेली जीवाभावाची मित्रमंडळी प्रत्येकाच्याच हृदयात एक खास ...

Dostigiri movie poster launches! | दोस्तीगिरी सिनेमाचे पोस्टर झाले लाँच !

दोस्तीगिरी सिनेमाचे पोस्टर झाले लाँच !

googlenewsNext
ळा आणि महाविद्यालयातली मैत्री ही नि:स्वार्थ, निरागस, आणि निखळ असते. कॉलेजच्या कट्ट्यावर भेटलेली जीवाभावाची मित्रमंडळी प्रत्येकाच्याच हृदयात एक खास स्थान मिळवून असतात. ह्या सुंदर नात्यावरचा दोस्तीगिरी हा चित्रपट येत्या 24 ऑगस्टला सिनेमागृहात झळकतो आहे.  

संतोष पानकर निर्मित, विजय शिंदे दिग्दर्शित ह्या सिनेमात संकेत पाठक, अक्षय वाघमारे, विजय गिते, पुजा मळेकर, पुजा जयस्वाल हे मुख्य भूमिकेत दिसतील. 'अरिहंत मुव्हिज क्रिएशन्स' प्रस्तूत 'मोरया मुव्हिज क्रिएशन्स' निर्मित "दोस्तीगिरी" या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद मनोज वाडकर ह्यांनी लिहीले आहेत.  

चित्रपटासंदर्भात सांगताना निर्माते संतोष पानकर म्हणतात, “मनोज वाडकर जेव्हा सिनेमाची कथा घेऊन आले तेव्हा कथा-पटकथा ऐकताक्षणीच ह्या सिनेमाची निर्मिती करायचे मी ठरवले. सिनेमाचे कथानक मैत्रीविषयीचं असल्याने दोस्तीगिरी आंतरराष्ट्रीय मैत्री दिवसाच्या सुमारासच रिलीज करायचा निर्णय आम्ही घेतला.” लेखक मनोज वाडकर सांगतात, “कॉलेज विश्व आणि त्या दिवसांतली बहरणारी मैत्री ह्यावर दोस्तीगिरी हा सिनेमा आहे. ह्या कथेतली पाच मित्र-मैत्रिणींची ‘दोस्तीगिरी’ आपण प्रत्येकजण आपल्या महाविद्यालयीन जीवनात जगलो असल्याची जाणीव हा सिनेमा पाहताना सर्वांनाच होईल असं मला वाटतं. माझ्या महाविद्यालयीन जीवनातले काही प्रसंग मी ह्या सिनेमात वापरले आहेत.” 

'अरिहंत मुव्हिज क्रिएशन्स' प्रस्तूत,  'मोरया मुव्हिज क्रिएशन्स' निर्मित, "दोस्तीगिरी" चित्रपट 24 ऑगस्ट 2018 ला रिलीज होणार आहे. संतोष वसंत पानकर निर्मित आणि विजय शिंदे दिग्दर्शित दोस्तीगिरी सिनेमातून संकेत पाठक चित्रपटसृष्टीत आपला डेब्यू करत आहे. या चित्रपटाचे कथानक मैत्री भोवती गुंफण्यात आल्याचे समजतेय. संकेत ह्याविषयी सांगतो, “ड्रिंमींग ट्वेंटिफोर सेवनच्या दुहेरी मालिकेमूळे मला खूप प्रसिध्दी मिळाली. आज मी महाराष्ट्रात कुठेही जातो, तर मला माझ्या नावाने नाही तर दुष्यंत अशी हाक मारतात. त्यामुळे मालिकेसाठी घेतलेली मेहनत आणि स्टार बनायचे माझे स्वप्न पूर्ण झाले.” “पण प्रत्येक कलाकाराला एकदा तरी रूपेरी पडद्यावर झळकावेसे वाटतेच. मलाही सिनेसृष्टीत पदार्पण करण्याची इच्छा होती. माझं हे स्वप्न आता दोस्तीगिरी सिनेमामुळे सत्यात उतरणार आहे. मनोज वाडकर ह्यांची कथा, पटकथा आणि संवांद असलेला हा सिनेमा जेव्हा माझ्याकडे आला, मी लगेच सिनेमा करायला होकार कळवला.”

Web Title: Dostigiri movie poster launches!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.